‘…म्हणून मी माघार घेतली’; शिवतारेंनी सांगितलं खरं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Shivtare | बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी निर्धार केला होता. त्यांनी काही दिवस बारामती लोकसभा मतदारसंघात जात मतदारांची भेट घेतली. मात्र त्यानंतर अजित पवार आणि विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यातील वाद देवेंद्र फडणवीस यांनी मिटवला. त्यानंतर विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यापासून माघार घेतली. यानंतर त्यांनी आता माघार घेण्यामागचं कारण सांगितलं आहे.

माघार घेण्याचं कारण

“मी माघार घेण्याचं कारण महायुती जिंकली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सर्व ऐकून मार्ग काढला. ऐतिहासिक सभा होईल त्या सभेचं आज नियोजन झालं. नियोजनासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आले होते. ठरलेलं महायुतीचं काम आपण करू.

उद्या सकाळी 11 वाजता महायुतीच्या नेत्यांची बैठक ठेवण्यात आली. महायुतीच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने विजय होईल,” असा विश्वास विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले विजय शिवतारे?

“सासवडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सासवडला सभा होणार आहे. ही केवळ सभा नाहीतर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद सभा आयोजित करण्यात येणार आहे. एखादी गोष्ट युद्ध करून मिळवता येते. मात्र तहात जर एखादी गोष्ट मिळत असेल तर युद्ध करण्याचं कारण काय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एअरपोर्ट गुंजवणेच्या पाण्यासंदर्भात चर्चा झाल्या. त्याबाबत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जनतेला सांगितील, अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली आहे.

“50 हजार लोकांच्या क्षमतेएवढी सभा होईल. याआधी सासवडला ज्या सभा झाल्या होत्या. त्या शिवसेनेच्या आणि माझ्या सभा झाल्या होत्या. लोकांच्या हिताचे प्रश्न आहेत. इतर कोणाचे प्रश्न नाहीत. विधानसभा निवडणूक लांब आहे. नेत्यांना काय बोलायचं आहे त्यावर ते बोलतील,” असं विजय शिवतारे म्हणाले.

News Title – Vijay Shivtare Explained Why Not File Candidancy In Election

महत्त्वाच्या बातम्या

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

बच्चू कडूंची नवी खेळी; महायुतीला मोठा धक्का

माढा लोकसभेसाठी शरद पवार?; महत्त्वाची माहिती आली समोर

आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, प्रकाश आंबेडकर होकार देणार का?

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिक्षकाला बेदम मारहाण!