“फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sushma Andhare | आगामी लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा सुरू होईल. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक ट्वीट केलं. त्याची सर्वत्र चर्चा आहे.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) या आपल्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता त्या त्यांच्या ट्वीटमुळे चर्चेत आल्यात. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांचं नाव घेत अखेर फडणवीसांना तावडे यांनी चितपट केल्याचा दावा केला आहे.

सुषमा अंधारेंचं ट्वीट

“पंकजा मुंडे , महादेव जानकर यांना उमेदवारी जळगावचा उमेदवार बदलण्याची तयारी, श्री एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट, फडणवीसांना 2-2दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना एका तासाच्या आत भेट. या सगळ्यांचा अर्थ. फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय..!”, असं ट्वीट सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलं आहे.

2019 चं नाराजी नाट्य

2019 मध्ये भाजपमध्ये नाराजी नाट्य झालं होतं. 2019 च्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांवेळी विनोद तावडे देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पंकजा मुंडेही नाराज होत्या. त्यानंतर लगेच भाजपमधून एकनाथ खडसे बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भूमिका घेतली. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अशा स्थितीमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी भाजपच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये आपली छाप सोडली. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस पदावर आहेत. यामुळे सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांच्या पोस्टमध्य़े फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केल्याचा दावा केला.

2019 मध्ये एकनाथ खडसे नाराज होते. त्याच्या दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजेच 2020 या वर्षामध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम केला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे पुन्हा भाजपकडे वापसी करणार आहेत.

News Title – Sushma Andhare Tweet On Devendra Fadanvis

महत्त्वाच्या बातम्या

माढा लोकसभेसाठी शरद पवार?; महत्त्वाची माहिती आली समोर

आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, प्रकाश आंबेडकर होकार देणार का?

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिक्षकाला बेदम मारहाण!

13 वर्षांच्या मुलीच्या प्रसंगावधानाने आनंद महिंद्रा झाले चकित; थेट दिली नोकरीची ऑफर

मोठी बातमी! ‘हा’ बडा नेता भाजपात घरवापसी करणार?