‘त्याने जबरदस्तीने माझ्या ब्रेस्टवर…’; अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकरने अत्यंत धक्कादायक खुलासा केला. अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर (Sonal Vengurlekar) कास्टिंग काऊचचा शिकार झाली होती. सोनल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण करिअरच्या सुरुवातीला तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे.

अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

वयाच्या 19 व्या वर्षी सोनलला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. मी टू मोहिमेदरम्यान सोनलने तिच्याबाबत घडलेली घटना सांगितली होती. मी 19 वर्षांची असताना चांगलं काम शोधत होते. त्यावेळी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कास्टिंग दिग्दर्शक आणि फोटोग्राफर राजा बजाज यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केल्याचा खुलासा तिने केलाय.

“जबरदस्तीने माझ्या ब्रेस्टवर क्रीम लावली”

त्या शूटिंगचा मी भाग नव्हते. पण कास्टिंग दिग्दर्शकाने मला काही आऊटफिट्स ट्राय करण्यास सांगितले. त्यानंतर जबरदस्तीने त्याने माझ्या ब्रेस्टवर क्रीम लावली. दिग्दर्शकाच्या या वागण्याने मी घाबरले होते. त्यानंतर मध्यरात्री तो जबरदस्तीने माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, कपडे काढून मंत्रोच्चार कर, रातोरात स्टार होशील, असा धक्कादायक अनुभव सोनलने शेअर केला आहे.

कास्टिंग दिग्दर्शकाने सोनलचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अभिनेत्रीने तिथून पळ काढला. दरम्यान तिच्यासोबत कुटुंबातील कोणीच नव्हतं, असंही सोनलने सांगितलं.

दरम्यान, सोनलने याबाबत तक्रार देखील केली. मात्र सोनवर पैसे उकळल्याचा आरोप लावण्यात आला. पैशांसाठी सोनल कास्टिंग दिग्दर्शकाला ब्लॅकमेल करायची असा आरोप करण्यात केला.

दरम्यान, सोनलने आतापर्यंत ‘वादा रहा’,’ये तेरी गलियां’,’साम दाम दंड भेद,’गुप्ता ब्रदर्स’,’शास्त्री सिस्टर्स’ सारख्या लोकप्रिय मालिकांध्ये काम केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

“फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय”

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

‘…म्हणून मी माघार घेतली’; शिवतारेंनी सांगितलं खरं कारण

बच्चू कडूंची नवी खेळी; महायुतीला मोठा धक्का