मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!

Manoj Jarange Patil Reaction After Sharad pawar And Chhagan Bhujbal Meeting

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा लढवण्याबाबत बीडच्या सभेमध्ये वक्तव्य केलं होतं. जर सरकारने आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणूक लढवणार. आपल्याला राजकारणाशी घेणं देणं नाही. पण आरक्षण नाही दिलं तर निवडणूक लढवावी लागणार असल्याचं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा म्हणालेत.

पुणे येथील देहू येथे संत तुकारामांच्या चरणी जरांगे लीन झाले. यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांना खुलं आव्हान दिलं.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदासंघामध्ये निवडणुकीसाठी उभे राहिल्यास राहू द्या मग आम्ही त्यांना सांगतो, असा इशारा भुजबळ यांना दिला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून उभे राहिल्यास…?

मराठा आंदोलक आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये काही महिन्यांआधी शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपलं नशीब आजमावणार आहेत. पत्रकारांनी जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला, मराठा समाजाने कोणत्या उमेदावारांना निवडून द्यावं? नाशिक लोकसभेमध्ये भुजबळ उभे राहिले तर तिथं मी भूमिका घेईल, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितलं.

जरांगे पाटील लवकरच नाशिकमध्ये

मनोज जरांगे पाटील नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक येथे छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. यावेळी छगन भुजबळ हे नाशिक लोकसभेचे उमेदवार असणार अशी चर्चा आहे. आता यावेळी मनोज जरांगे सभेमध्ये काय बोलतील? हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Manoj Jarange Patil Serious Warning To Chhagan Bhujbal

महत्त्वाच्या बातम्या-

‘…त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

“फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय”

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

बच्चू कडूंची नवी खेळी; महायुतीला मोठा धक्का

माढा लोकसभेसाठी शरद पवार?; महत्त्वाची माहिती आली समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .