आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज (07 एप्रिल) रोजी पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. या वेळी ते पुणे शहरातील मराठा समाजाच्या वेगवेगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. दरम्यान, बैठकीत बोलत असताना जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं. जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाच्या मनात खदखद आहे. मराठा समाजाला आरक्षण देतो असं सांगून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी धोका दिला. मात्र, आता आरक्षणाबाबत जरांगेंनी मोठी घोषणा केली आहे.

माझ्याकडे राजकीय मार्ग नाही-

आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गावागावात जाऊन मी बैठक घेणार असं जरांगे (Manoj Jarange Patil)  म्हणाले. दरम्यान, जरांगेंनी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. सरकारने एक दिवसीये विशेष अधिवेशन घेत जरांगेंच्या मागण्या पूर्ण केल्या. एवढंच नाही तर, मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देखील दिले. मात्र, जरांगेंना हे मान्य नाही त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे आंदोलन करत आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना जरांगे म्हणाले की, माझ्याकडे काही राजकीय मार्ग नसल्याने मी त्यापासून अलिप्त आहे, आणि मी कोणताही उमेदवार दिला नाही आणि कुणाला पाठिंबाही दिलेला नाही.

पुढे काय म्हणाले?

पुढे जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले की, समाजाने ही निवडणूक हातात घेतली आहे. समाज ज्याला पाडायचं आहे त्याला पाडेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण माझं ध्येय आहे आणि मी त्यावर ठाम आहे. मात्र हे खरं आहे या सरकारने मला खूप त्रास दिला आहे. ज्याप्रकारे उपमुख्यमंत्री यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत आणि आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला आहे ते त्यांना या निवडणुकीत खूप जड जाणार आहे.

डाव यशस्वी झाला असता-

जरांगे पुढे म्हणाले की, माझा समाज हुशार आहे. मात्र, माझा नाईलाज आहे. सात महिन्यांत मी एकही गृहमंत्री आणि सरकारचा डाव यशस्वी होऊ दिला नाही, त्यांचा डाव यशस्वी झाला असता तर मी समाज एकत्र केला आणि मीच समाजाला मातीत घातलं असं झालं असतं. जर राज्यातील सरकारने आम्हाला सहा जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं तर विधानसभा निवडणुकीला संपूर्ण महाराष्ट्र काबीज करणार, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारला दिला आहे.

News Title : Manoj Jarange Patil gives new announcement

महत्त्वाच्या बातम्या-

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!

‘त्याने जबरदस्तीने माझ्या ब्रेस्टवर…’; अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

‘…त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

“फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय”

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!