सलमान खान राजकारणात करणार प्रवेश?; ‘या’ बड्या नेत्याने घेतली भेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ashish Shelar | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. याकडे सर्व देशवासियांचं लक्ष लागलं आहे. अब की बार 400 पार म्हणत भाजप जोरदार प्रचार करतंय. राजकारणामध्ये आता अभिनेत्यांनी देखील रस दाखवला आहे. काही दिवसांआधी अभिनेता गोविंदाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. तसेच त्याआधी बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतला देखील भाजपने लोकसभेचं तिकीट दिलं.

अशातच आता राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळे ट्वीस्ट निर्माण होताना दिसत आहेत. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांची भेट घेतली. यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये आणखी काहीतरी घडण्याची शक्यता आहे. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ashish Shelar)

कंगना राणौत, अरूण गोविल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता आशिष शेलार (Ashish Shelar) आणि सलमान खान यांच्या भेटीने राजकारणात एकच खळबळ उडाली. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सलमान खान आणि वडील साहील खान यांची भेट घेतल्यानंतरचे फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यासोबत त्यांनी सलमान खानसोबत घालवलेला वेळ आणि केलेली बातचीत ट्वीटरवर शेअर केली आहे.

काय आहे ट्वीट?

सलमान खान आणि वडील सलीम खान यांच्यासोबतचे फोटो त्यांनी शेअर केलेत. त्यावेळी त्यांनी, “सलमान खान, सलीम खान आणि हेलनजी यांना भेटून आनंद झाला. त्यांच्यासोबत दुपारचं जेवन केलं आणि आरोग्य सेवा, गरजूंना मदत कशी करता. त्यांच्या या सामाजिक कार्यावर चर्चा केली. सलीमजींनी हे कार्य पूर्ण केलं आणि गेली दोन दशक याचा पाठपुरावा देखील केला जात आहे.”


गेली अनेक वर्षांपासून खान कुटुंबिय मनोरंजन क्षेत्रातील आपलं काम सांभाळत सामाज कार्य करतात. सलीम खान हे आजही समाजकार्य करतात. सलमान खानची स्वत:ची ‘बीईंग ह्युमन’ नावाची संस्था आहे. याबाबत आशिष शेलार यांनी खान कुटुंबियांची भेट घेतली होती.

दरम्यान, आशिष शेलार आणि सलमान खान यांच्या भेटीने राजकीय वर्तुळामध्ये ट्वीस्ट घडण्याची शक्यता आहे. आशिष शेलार यांच्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

News Title – Ashish Shelar Meet To Salman Khan

महत्त्वाच्या बातम्या-

बहुप्रतीक्षित ‘पुष्पा: द रूल’चा टीजर रिलीज; अल्लू अर्जुनच्या हटके लुकने वेधलं लक्ष

सलमान खान राजकारणात करणार प्रवेश?; ‘या’ बड्या नेत्याने घेतली भेट

भाजपत प्रवेश करताच खडसेंना मिळणार मोठं गिफ्ट?

अल्लू अर्जुन आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या संपत्तीचा मालक!

आज लागणार संपूर्ण सूर्यग्रहण, भारतात कुठे आणि कसं पाहणार लाईव्ह?, जाणून घ्या सविस्तर