आज लागणार संपूर्ण सूर्यग्रहण, भारतात कुठे आणि कसं पाहणार लाईव्ह?, जाणून घ्या सविस्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Total Solar Eclipse 2024 | आज 8 एप्रिल रोजी, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येईल, तेव्हा पृथ्वीवर अनेक ठिकाणी लोक सूर्यग्रहण पाहतील. भारतीय वेळेनुसार, हे सूर्यग्रहण आज रात्री 9.12 ते 9 एप्रिल रोजी पहाटे 2.22 पर्यंत राहील. काही सूर्यग्रहणाचा कालावधी 05 तास 10 मिनिटांचा असेल.

यावर्षीचे हे पहिले सूर्यग्रहण असणार आहे. भारतातील लोक या सूर्यग्रहणाबद्दल जरा विचलित आहेत. कारण, सुमारे 54 वर्षांनी हे सूर्यग्रहण लागेल. दुसरं कारण म्हणजे, हे सूर्यग्रहण चैत्र नवरात्रीच्या एक दिवस आधी होईल. आता हे सूर्यग्रहण कुठे दिसणार?, भारतात त्याचा काय परिणाम होईल?, सूर्यग्रहण किती वाजता होईल आणि कुठे दिसेल?, असे प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाले आहेत. या लेखात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

सूर्यग्रहण केव्हा लागणार?

यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण आज 8 एप्रिलरोजी सोमवारी लागेल. हे ग्रहण संपूर्ण सूर्यग्रहण असेल आणि सर्वात जास्त काळ असेल. या खगोलीय घटनेदरम्यान नासा एक विशेष प्रयोगही (Total Solar Eclipse 2024) करणार आहे. नासाची टीम आज तीन रॉकेट प्रक्षेपित करणार आहे. एक रॉकेट ग्रहणापूर्वी , दुसरे सूर्यग्रहण दरम्यान आणि ग्रहण संपल्यानंतर 45 मिनिटांनी तिसरे रॉकेट प्रक्षेपित केले जाईल.

सूर्यग्रहणाची वेळ काय?

आज 8 एप्रिलरोजी सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9.12 ते 9 एप्रिल रोजी रात्री पहाटे 2.22 पर्यंत राहील. काही सूर्यग्रहणाचा कालावधी 05 तास 10 मिनिटांचा असेल. या काळात 4 मिनिटे 11 सेकंद आकाशात पूर्ण अंधार असेल.

भारतात सूर्यग्रहण दिसणार?

आज होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, असे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथे सुतक कालचे नियम लागू होणार नाहीत किंवा पूजा आणि प्रार्थना यांसारख्या इतर कोणत्याही दैनंदिन क्रियांना बंधने राहणार नाहीत. भारत (Total Solar Eclipse 2024) वगळता हे सूर्यग्रहण मेक्सिको, उत्तर अमेरिका, कॅनडा, जमैका, आयर्लंड, उत्तर पश्चिम इंग्लंड, क्युबा, डॉमिनिका, कोस्टा रिका, पश्चिम युरोप, फ्रेंच पॉलिनेशिया, पॅसिफिक, अटलांटिक आणि आर्क्टिकमध्ये दिसणार आहे. हे ग्रहण सर्वप्रथम मेक्सिकोतील माझाटियन शहरात दिसणार आहे.

सूर्यग्रहण कसे पाहणार?

सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते. ते पाहण्यासाठी विशेष ऑप्टिकल चष्मा वापरावा. यामुळे सूर्याच्या किरणांपासून तुमच्या डोळ्यांना इजा होणार नाही आणि तुमची रेटिना सुरक्षित राहील.

सूर्यग्रहण लाईव्ह कुठे बघता येईल?

भारतातील नागरिक हे सूर्यग्रहण लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहू शकतात. 8 एप्रिल रोजी नासाकडून त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. सूर्यग्रहण लाईव्ह बघण्यासाठी तुम्ही नासाच्या अधिकृत पेजवर भेट देऊ शकता. किंवा त्यांच्या यूट्यूबवरही बघता येईल.

News Title – Total Solar Eclipse 2024

महत्वाच्या बातम्या- 

हवामान विभागाचा मोठा इशारा ; ‘या’ भागात गारपीटीची शक्यता

‘या’ राशीच्या लोकांचे नातेसंबंध सुधारतील, वाचा राशीभविष्य

हार्दिक पांड्याला महादेव पावला, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मिळालं मोठं यश

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!