अल्लू अर्जुन आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या संपत्तीचा मालक!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Allu Arjun | ‘पुष्पा’ फेम लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन आज (8 एप्रिल) आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. लवकरच त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटानंतर अल्लूच्या करिअरने अशी काही भरारी घेतली की, जिथे तो एका चित्रपटासाठी 18 ते 20 कोटी रुपये घेत होता, तिथे आता तो 90 ते 150 कोटी रुपये मानधन घेतो.

त्याने ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘पुष्पा: द रूल’ साठी 330 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आज त्याच्या वाढदिवशी ‘पुष्पा: द रूल’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

अल्लू अर्जुन नेटवर्थ आणि प्रॉपर्टी

आयकॉन स्टार अल्लू अर्जुन संपत्तीच्या बाबतीतही मागे नाहीये. काही रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनची एकूण नेटवर्थ ही 460 कोटी आहे. अल्लू अर्जुनचं घर हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात आहे. या घराचा एरिया हा 8000 स्क्वेअर फीट असल्याचं म्हटलं जातं. अल्लू अर्जुनच्या या घराची किंमत ही 100 कोटी आहे. फक्त हैदराबादमध्येच नाही तर इतर ठिकाणी देखील त्याची घरं आहेत.

अल्लू अर्जुनकडे (Allu Arjun) कारचेही मोठे कलेक्शन आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू एक्स6 कूव, पोर्शे आणि जॅगवार या गाड्या आहेत. यासोबतच त्याच्याकडे हमर H2, जॅगवार XJ L, वोल्वो XC90 T8 एक्सीलेंस, BMW X6 M स्पोर्ट आणि मर्सिडीज GLE 350d गाड्या देखील आहेत.

याव्यतिरिक्त अल्लूकडे स्वतःची एक व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 7 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. त्याची ही व्हॅनिटी व्हॅन फार लग्झरी आहे. यात टीव्ही पासून इतर सर्व उपयोगाच्या गोष्टी आहेत. आज अल्लू अर्जुनचे जगभरात चाहते दिसून येतात. त्याने वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. 1985 मध्ये प्रदर्शित झालेला चिरंजीवी अभिनित ‘विजेता’ हा त्याचा पहिला चित्रपट होता.

कधी केली कारकिर्दीची सुरुवात?

2004 साली आलेल्या ‘आर्या’ या चित्रपटाने अल्लू अर्जुनला (Allu Arjun) प्रसिद्धी मिळाली. अवघ्या 4 कोटीत बनलेल्या या चित्रपटाने तब्बल 30 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने अल्लू अर्जुनला एक वेगळी ओळख मिळवून दिली. पुढे हा चित्रपट हिंदीत देखील डब झाला आणि चित्रपटाने अल्लू अर्जुनला हिंदीत लोकप्रियता मिळवून दिली.

‘आर्या’ या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनने ‘बनी’, ‘हॅपी’, ‘देसमुदुरु’ आणि ‘पारुगु’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचे हे सगळे चित्रपट सुपरहिट ठरले. याशिवाय अल्लू अर्जुनने ‘वेदम’, ‘जुलाई’, ‘सन ऑफ सत्यमूर्ती’, ‘सरायनायडू’, ‘डीजे’ आणि ‘आला वैकुंठपुरमलो’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.

News Title- Allu Arjun Net Worth

महत्त्वाच्या बातम्या –

हवामान विभागाचा मोठा इशारा ; ‘या’ भागात गारपीटीची शक्यता

‘या’ राशीच्या लोकांचे नातेसंबंध सुधारतील, वाचा राशीभविष्य

हार्दिक पांड्याला महादेव पावला, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मिळालं मोठं यश

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!