हवामान विभागाचा मोठा इशारा ; ‘या’ भागात गारपीटीची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather Update | राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेची लाट तर कुठे अवकाळी पाऊस, असं हवामान दिसून येतंय. पुढील काही दिवस कोकण, गोव्यात तापमान वाढणार आहे. येथे उष्णता अधिक जाणवेल.

तर विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच काही ठिकाणी गरपीटदेखील होणार असल्याने यलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

पूर्व विदर्भापर्यंत असलेली वाऱ्याची द्रोणिका रेषा आजही विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक आणि तमिळनाडू पर्यंत जात असल्याने पुढील काही दिवस राज्यात हवामान कोरडं राहील. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होईल.

‘या’ भागांत अवकाळीचा इशारा

आज (8 एप्रिल) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उष्णता वाढणार आहे. येथे उष्णतेची लाट येईल. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. तर, विदर्भात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.

पुढील काही दिवस विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना (Maharashtra Weather Update) विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर आज आणि उद्या विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा येथे अवकाळी पाऊस पडेल.

पुण्यातील हवामान असं राहील

पुढील काही दिवस पुण्यात वातावरण अंशत: ढगाळ राहील. तर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे तापमान थोडं कमी झाल्याने ढगाळ हवामान तयार झालंय. यामुळे पुणेकरांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला आहे.

News Title – Maharashtra Weather Update 

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिक पांड्याला महादेव पावला, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मिळालं मोठं यश

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!

‘त्याने जबरदस्तीने माझ्या ब्रेस्टवर…’; अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

‘…त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा