भाजपत प्रवेश करताच खडसेंना मिळणार मोठं गिफ्ट?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Khadase | लोकसभा निवडणूक तोंडावर असताना एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadase) भाजप प्रवेशामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यायची होती. मात्र एकनाथ खडसे यांनी आपण आजारी असल्याने निवडणूक लढवणार नाही, असं सांगितलं होतं. काही दिवसांआधी त्यांच्या सून आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना माध्यमांनी एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना त्यांनी एकनाथ खडसे भाजपमध्ये आले तर चांगलंच आहे, असं त्या म्हणाल्या. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर खडसे यांना मोठ्या पदाची ऑफर असल्याची चर्चा आहे.

राज्यपाल पदाची जबाबदारी दिली जाणार?

एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी साडे तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली. आता पुन्हा एकदा त्यांनी भापजमध्ये जाणार असल्याचं सांगितलं. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांना राज्यपाल पदाची धुरा सांभाळायला दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. मात्र अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाही.

दरम्यान, 2014 या वर्षात भाजपची सत्ता आली. त्यावेळी एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी स्वत:ला घरात बंद करून घेतलं होतं. त्यांनी बंड पुकरालं होतं. तेव्हा ते नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांना यश आलं.

त्यांना त्यावेळी महसूल मंत्रीपद देण्यात आलं. मात्र त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आल्यानं त्यांचं मंत्रीपद गेलं. त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. खडसे आपल्याच पक्षामध्ये घुसमटत होते. त्यानंतर 2019 मध्ये आपली मुलगी रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. खडसेंचे जावई जमीन घोटाळ्याप्रकरणी अनेक वर्षे जेलमध्ये होते. यासर्व गोष्टींमुळे खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेमध्ये पक्षप्रवेश केला. आता पुन्हा ते भाजपच्या वाटेवर आहेत.

“दिल्लीमध्ये माझा पक्षप्रवेश होणार”

माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “मी काही दिवसांमध्ये माझ्या स्वगृही जाणार आहे. दिल्लीमध्ये माझा पक्षप्रवेश होणार आहे. भाजपच्या जडणघडणीत माझे योगदान आहे. 40 ते 42 वर्षे मी या घरात राहिल्यानंतर स्वाभाविकपणे माझी या घराविषयी हळवी जागा आहे. मात्र काही कारणाने मी नाराज होतो. म्हणून मी या पक्षातून बाहेर पडलो. आता माझ्यामध्ये नाराजीची तीव्रता कमी झाल्याने पुन्हा पक्षामध्ये प्रवेश करत आहे.”

“भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न नव्हता. मात्र पक्षातील वरिष्ठांनी मला येण्याबाबत सांगितलं. तुम्ही आलं पाहिजे असं आज नाहीतर गेली पाच ते सहा महिन्यांपासून मला बोलावलं जातंय. तेव्हा पासून ही चर्चा सुरू होती”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

News Title – Eknath Khadase Will Joined BJP

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!

‘त्याने जबरदस्तीने माझ्या ब्रेस्टवर…’; अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

‘…त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

“फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय”

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!