बहुप्रतीक्षित ‘पुष्पा: द रूल’चा टीजर रिलीज; अल्लू अर्जुनच्या हटके लुकने वेधलं लक्ष

Pushpa 2 Teaser Out | साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा-द राईज’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अनेक नवे रेकॉर्ड केले. आता चित्रपटाचा दूसरा पार्ट येणार आहे.

‘पुष्पा- द राईज’च्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी आता ‘पुष्पा- द रुल’ चा टीजर प्रदर्शित केला आहे. आज (8 एप्रिल) यातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी चित्रपटाचा जबरदस्त टीजर रिलीज झाला आहे. यात अल्लू अर्जुनचा हटके लुक पाहून चाहते उत्सुक झाले आहेत.

Pushpa 2 चा टीजर रिलीज

पुष्पा: द रुलच्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन पूर्णपणे नवीन अवतारात दिसत आहे. साडी, दागिने आणि फुल मेकअपसह पुष्पाच्या लूकने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. 1 मिनिट आणि 8 सेकंदांच्या या टीझरमध्ये डोक्यापासून पायापर्यंत अल्लू अर्जुन आपल्या लूकने आश्चर्यचकित करत आहे. टीझरमधील त्याच्या अॅक्शनमधून पुष्पा राजच्या पॉवर पॅक्ड परफॉर्मन्सची झलक पाहायला मिळते.

या चित्रपटातील पोस्टरनेही सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता अल्लू अर्जुनचा पूर्ण लुक निर्मात्यांनी उघड केला. याचा टीजर (Pushpa 2 Teaser Out) काही क्षणातच वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. यावर चाहते प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत. हा चित्रपट चंदनाची तस्करी करणाऱ्या पुष्पा राजची कहाणी आहे.

चाहत्यांना आता याच्या दुसऱ्या पार्टची आतुरता लागली आहे. यापूर्वी कानात झुमके, गळ्यात सोन्याची दागिने तसेच लिंबूचा हार, लाल टिकली आणि काजळ असा अवतार घेत अल्लू अर्जुनचा पहिला लुक पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. आता टीजरमध्ये पुष्पाचा नवा अंदाज सर्वांनाच भावला आहे.

‘या’ तारखेला रिलीज होणार पुष्पा 2

बहुचर्चित असा हा ‘पुष्पा 2’ ( Pushpa 2 ) चित्रपट 15 ऑगस्ट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तामीळ, तेलुगू, हिंदी आणि इतर भाषेतही हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.याच्या पहिल्या पार्टने बरीच कमाई केली होती. आता चाहते याच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट बघत आहेत.

News Title- Pushpa 2 Teaser Out

महत्त्वाच्या बातम्या –

हवामान विभागाचा मोठा इशारा ; ‘या’ भागात गारपीटीची शक्यता

‘या’ राशीच्या लोकांचे नातेसंबंध सुधारतील, वाचा राशीभविष्य

हार्दिक पांड्याला महादेव पावला, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मिळालं मोठं यश

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!