पत्नी बनवायची रिल्स, रिल्सखालच्या कमेंट वाचून पतीनं घेतला हादरुन टाकणारा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Crime News | सध्याच्या युगामध्ये अनेकांच्या हातात सोशल मीडिया आहे. अनेकांना वेगवेगळ्या माध्यमातून आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. यामुळे अनेकजण रिल्स बनवतात. अनेकांना रिल्सच्या माध्यमातून यश देखील मिळवलं आहे. मात्र याच रिल्समुळे एका कुटुंबाचं होत्याचं नव्हतं होऊन बसलं आहे. (Crime News)

पत्नीच्या रिल्सवर अश्लील कमेंट्स

सोशल मीडियावर अनेकांना आपलं टॅलेंट दाखवायचं असतं. अनेकांना घरदार, मुलं-बाळ, शिक्षण, नोकरी वगैरे सांभाळून आपल्यातील कौशल्य दाखवायचं असतं. मात्र हेच एकदिवस अंगलट देखील येऊ शकतं. पत्नीच्या रिल्सवर येणाऱ्या अश्लील कमेंट्सने पतीनं धक्कादायक पाऊल उचललं आहे. यामुळे सारं कुटुंब उध्वस्त झाल्याची माहिती समोर आली. अलवेर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. (Crime News)

पत्नीचं नाव हे माया होतं तर पतीचं नाव हे सिद्धार्थ होतं. माया रिल्स काढत असायची. तिला रिल्स काढायची आवड होती. मात्र तिच्या रिल्सच्या कमेंटमध्ये अनेकजण अश्लील कमेंट्स करायचे. यामुळे तिचा पती सिद्धार्थने संताप व्यक्त केला. त्यानंतर माया आणि सिद्धार्थमध्ये अनेकदा वाद झाला होता. सिद्धार्थने मायाला रिल्स बनवू नको असं सांगितलं. मात्र पत्नीनं आपल्या पतीचं ऐकलं नाही. यावरून घरामध्ये वाद होऊ लागला. ( Crime News)

सिद्धार्थ हा दारूच्या नशेमध्ये होता. यामुळे दोघांमध्ये अधिक वाद वाढू लागला. त्यावेळी पत्नी मायाने आपल्यासोबत आपली मुलं घेत आपल्या माहेरी गेली आणि सिद्धार्थवर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. (Crime News)

पती आत्महत्या करण्यापूर्वी आला लाईव्ह

मायाच्या रिल्सवर अश्लील कमेंट्स करणाऱ्यांना सिद्धार्थने सुनावलं. सिद्धार्थ लाईव्ह जात जे आपल्या पत्नीच्या रिल्सला अश्लील कमेंट करतात. त्यांना चांगलंच सुनावलं. कुटुंबामध्ये वाद सुरू असल्याचं देखील त्यानं सांगितलं. त्यावेळी सिद्धार्थनं 5 एप्रिलला आत्महत्या केली. त्यानंतर 6 एप्रिलला कुटुंबियांनी एफआयआर दाखल केली.

पोलिस अधीक्षक (एसपी) आनंद शर्मा यांनी याप्रकरणाचा तापास करत असल्याचं सांगितलं. याबाबत कुटुंबीयांचा जबाब घेतला जात आहे. दरम्यान सिद्धार्थ आत्महत्या करण्यापूर्वी लाईव्ह गेला होता. त्यानंतर त्याने आत्महत्या केली.

News Title – Crime News In Hausband Aggressive On His Wife About Reels

महत्त्वाच्या बातम्या

अबब! सोनं 71 हजार पार, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड; जाणून घ्या आजचे दर

आज सोमवती अमावस्या, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचा विधी

पुणे हादरलं! शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणीसोबत घडला भयानक प्रकार

“सुप्रिया सुळे माझा दादा माझा दादा म्हणायच्या तेव्हा खूप राग यायचा”

अर्धशतक हुकलं तरीही रोहितने मोडला धोनीचा विक्रम!