चेन्नई कोलकाताचा विजयी रथ रोखणार?, आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी?

CSK vs KKR | चेन्नईच्या खराब फलंदाजीमुळे संघाला सलग दोन पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चेन्नईने बंगळुरूला पराभूत करत विजयी सुरुवात केली. संघाने 4 सामन्यांपैकी दोन सामने जिंकले तर दोन गमावले. दुसरीकडे कोलकाताचा विजयी रथ सुसाट आहे. कोलकाताने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत आणि या तिन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे.

चेन्नई आज घरच्या मैदानावर कोलकाताला आव्हान देईल. चेन्नई सुपर किंग्जला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून देण्यासाठी कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि युवा खेळाडू रचिन रवींद्र यांना आपल्या खेळात सुधारणा करावी लागणार आहे. गायकवाडने 118.91 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत तर रवींद्र गेल्या दोन सामन्यांमध्ये प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे.

CSK vs KKR सामना

शिवम दुबे हा सध्याच्या स्पर्धेतील सुपर किंग्जचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याने 160.86 च्या स्ट्राइक रेटने 148 धावा केल्या आहेत. वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान आणि मथिशा पथिराना हे वेगवेगळ्या कारणांमुळे संघाच्या शेवटच्या सामन्यात खेळू शकले नाहीत, ज्यामुळे सुपर किंग्जच्या गोलंदाजीमधील कमकुवतपणा दिसून आला.

आता मुस्तफिझूर रहमान आणि मथिशा पथिराना हे दोघे बाहेर राहिल्यास दीपक चहर, तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी तर वेगवान गोलंदाजीसाठी मोईन अली, रवींद्र जडेजा आणि महेश तीक्षणा यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.

यंदाच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आतापर्यंत अपराजित आहेत आणि दोन्ही संघांना तूफान फलंदाजीचा फायदा झाला आहे. केकेआरचा सुनील नरेन आणि आंद्रे रसेल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे नरेनला आणि रसेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवणे सुपर किंग्जच्या गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल.

CSK vs KKR संभाव्य प्लेयिंग 11

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संभाव्य प्लेयिंग इलेव्हन संघ : रुतुराज गायकवाड (c), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (wk), दीपक चहर, महेश तीक्षणा, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संभाव्य प्लेयिंग इलेव्हन संघ : फिल सॉल्ट (wk), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (c), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा

News Title- CSK vs KKR Today IPL 2024 Match

महत्त्वाच्या बातम्या –

हार्दिक पांड्याला महादेव पावला, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मिळालं मोठं यश

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!

‘त्याने जबरदस्तीने माझ्या ब्रेस्टवर…’; अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

‘…त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा