अबब! सोनं 71 हजार पार, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड; जाणून घ्या आजचे दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate Today | मौल्यवान धातूच्या किमती सध्या रॉकेटच्या तेजीत आहेत. सोन्याने आता उच्चांक गाठला आहे. या महिन्यात सोनं तब्बल 71 हजारी पार गेलं आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. यामुळे सराफ मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी एकदमच कमी झाली आहे. या दरवाढीमुळे आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड तुटले.

एप्रिल महिन्यात अगदी पहिल्या दिवसापासून सोने-चांदीच्या किमती वाढत गेल्या. 1 एप्रिल रोजी सोन्याने 930 रुपयांची भरारी घेतली. 2 एप्रिल रोजी त्यात 250 रुपयांची घसरण झाली. 3 एप्रिलला सोने 750 रुपयांनी वधारले. 4 एप्रिल रोजी 600 रुपयांनी दर वाढले. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं 71 हजाराच्या पार गेलं आहे.

आजचे सोने-चांदीचे दर

एमसीएक्सवर सोन्याचा भाव 440 रुपये म्हणजेच 0.62 टक्क्यांनी वधारून 71,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात 1076 रुपयांनी म्हणजेच 1.33 टक्क्यांनी (Gold-Silver Rate Today) वाढ झाली आहे. डॉलर निर्देशांक (DXY)104.25 च्या जवळपास घसरल्याने चांदी वायदा दर 82,064 रुपयांच्या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

मुंबईत आज (8 एप्रिल)10 ग्रॅम सोन्याचा दर 71,350 रुपये आहे. तर काल 10 ग्रॅम सोन्याचा दर 71,699 रुपये होता. तर, मुंबईत आज एक किलो चांदीचा दर 83,400 रुपये होता. तर काल एक किलो चांदीचा दर 81, 700 रुपये होता.

देशात सोने-चांदीचे दर काय?

आज दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 71,210 रुपये तर काल 72,118 रुपये होता. तसंच चांदीचा भाव 83,400 रुपये प्रति किलो होता. चेन्नईत आज दहा ग्रॅम सोन्याचा (Gold-Silver Rate Today) भाव 71,070 रुपये आहे. तर काल 72,118 रुपये होता. चेन्नईत आज एक किलो चांदीचा दर हा 86,900 रुपये होता.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केले जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title- Gold-Silver Rate Today April 8 

महत्वाच्या बातम्या-

पुणे हादरलं! शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणीसोबत घडला भयानक प्रकार

“सुप्रिया सुळे माझा दादा माझा दादा म्हणायच्या तेव्हा खूप राग यायचा”

अर्धशतक हुकलं तरीही रोहितने मोडला धोनीचा विक्रम!

बहुप्रतीक्षित ‘पुष्पा: द रूल’चा टीजर रिलीज; अल्लू अर्जुनच्या हटके लुकने वेधलं लक्ष

सलमान खान राजकारणात करणार प्रवेश?; ‘या’ बड्या नेत्याने घेतली भेट