आज सोमवती अमावस्या, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचा विधी

Somwati Amavasya 2024 | आज (8 एप्रिल) सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नदी, तलाव किंवा कुंडात स्नान करून सूर्यदेवाला नमन करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे फलदायी मानले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे देखील शुभ मानले जाते.

हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्यात अमावस्या असते. त्यात सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. या दिवशी चंद्र दिसत नाही. यावेळी चैत्र महिन्यातील सोमवती अमावस्या ८ एप्रिल म्हणजेच आज आहे.

आजच्या दिवसही दान-धर्म करण्याला खूप महत्व आहे. धार्मिक शास्त्रानुसार, सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेल्या दानामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. सोमवती अमावस्या चैत्र अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. आजच्या दिवसही पूजेचा शुभ मुहूर्त कोणता, पूजन विधी याबाबत सविस्तर या लेखात माहिती दिली आहे.

सोमवती अमावस्या शुभ मुहूर्त

चैत्र महिन्यातील सोमवती अमावस्या आज 8 एप्रिलला रात्री 3:21 वाजता सुरू झाली आहे आणि आज रात्री 11:50 वाजता ती समाप्त होईल. याकाळात तुम्ही पूजा विधी करू शकता. आजच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करावी, लाभ होईल.

सोमवती अमावस्या पूजन विधी

या दिवशी (Somwati Amavasya 2024 ) कोणत्याही पवित्र नदीत, तलावात किंवा कुंडात स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यावेळी गायत्री मंत्राचे पठन करावे. यानंतर भगवान शंकराची पूजा करावी.पूजेनंतर गरजू व्यक्तीला अन्न आणि वस्त्र दान करा. या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित महिला पिंपळाची पूजा करतात.

धनप्राप्तीचा उपाय

अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीच्या पाण्यात 5 लाल फुले आणि 5 जळणारे दिवे सोडावेत. या उपायाने धनलाभ होण्याचा प्रबळ योग होईल. संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा. बत्तीमध्ये कापसाऐवजी लाल धागा वापरा. या दिव्यात थोडे केशरही टाकावे.

News Title-  Somwati Amavasya 2024 shubha muhurat

महत्त्वाच्या बातम्या –

हार्दिक पांड्याला महादेव पावला, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मिळालं मोठं यश

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!

‘त्याने जबरदस्तीने माझ्या ब्रेस्टवर…’; अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

‘…त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा