“तुम्ही वय काढू नका, तुम्ही अजून…”, पवारांनी विरोधकांना सुनावलं

Sharad Pawar | लोकसभा निवडणूक तोंडावर असताना प्रत्येक उमेदवार आपल्या नेत्यांसोबत आपापल्या मतदारसंघात पाहणीसाठी जात आहे. देशातील लक्षवेधी ठरणारा मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाकडं पाहिलं जातं. यंदाच्या बारामती लोकसभा मतदासंघातील चित्र विचित्र झालेलं पाहायला मिळालं आहे. नणंद-भावजय एकमेकांविरोधात लढणार आहेत. यापार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. याआधी अजित पवार यांनी शरद पवार यांना वयावरून अनेकदा डिवचलं होतं. आता देखील शरद पवार हे बारामतीच्या दुष्काळ भागात जात दौरा करताना दिसत आहेत. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या वयावरून बोलणाऱ्या विरोधकांना सुनावलंय.

“तुम्ही वय काढू नका तुम्हाला काय माहितीये…”

शरद पवार यांना अनेकदा अजित पवार यांनी वयावरून टीका केली. शरद पवार म्हणाले की, “अनेकजण म्हणतात की वय झालं. 84, 85 वय झालं. तुम्ही वय काढू नका. तुम्ही अजून काय पाहिलं आहे. हा गडी थांबणारा नाही. ज्या लोकांना संधी दिली त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताचं काम करत राहिलं”, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

“मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मदत केली होती”

बारामतीच्या उंडवडी येथे शरद पवार (Sharad Pawar) दुष्काळ दौऱ्यावर होत. यावेळी ते म्हणाले की, “गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्याला मी कृषिमंत्री असताना मदत केली होती. मी कधी असं बघितलं नाही की ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कोणत्या पक्षाचे आहेत. त्या राज्यातील शेतकरी सुखी राहिला पाहिजे असं धोरण मी राबवलं”, असं शरद पवार म्हणाले.

मागे एकदा नरेंद्र मोदी यांनी बारामतीला येण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी ते आल्यानंतर त्यांनी भाषण करत असताना सांगितलं, मी जो काही घडलो आहे, हे काम कसं करायचं मला पवार साहेबांनी बोट धरून शिकवलं आहे. आज तेच पंतप्रधान वेगळी भूमिका घेत आहेत. जर इतर कोणी वेगळी भूमिका घेतली तर त्यांच्यावर कारवाई होत आहे, असं पवार म्हणालेत.

झारखंड राज्याचे आदिवासी मुख्यमंत्री यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली तर त्यांना लगेच तरूंगात टाकलं जातंय. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना देखील आज जेलमध्ये टाकण्यात आलंय, असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जात मतदारांना विश्वासात घेत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील बारामती मतदारसंघाच्या ग्रामीण भागात जात मतदारांसोबत चर्चा करत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. दोन्ही गटामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

News Title – Sharad Pawar Critisize Opposition For Alway talking About His Age

महत्त्वाच्या बातम्या 

भाजपत प्रवेश करताच खडसेंना मिळणार मोठं गिफ्ट?

अल्लू अर्जुन आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या संपत्तीचा मालक!

आज लागणार संपूर्ण सूर्यग्रहण, भारतात कुठे आणि कसं पाहणार लाईव्ह?, जाणून घ्या सविस्तर

हवामान विभागाचा मोठा इशारा ; ‘या’ भागात गारपीटीची शक्यता

‘या’ राशीच्या लोकांचे नातेसंबंध सुधारतील, वाचा राशीभविष्य