Raju Shetty | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. त्यांना ठाकरे गटाकडून ऑफर आली होती. त्याबद्दल त्यांनी सांगितलं. गेल्या सहा महिन्यांपासून हातकणंगलेची जागा सोडल्याबाबत सांगितलं जात होतं. मात्र आम्ही महाविकास आघाडी आणि महायुती सोडल्याचं राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं.
महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर भाष्य
महायुतीच्या प्रस्तावर राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. “महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर मी दोनदा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी शिवसेना सोडून गेलेल्यांना धडा शिकवायचा असेल तर मला पाठिंबा द्या. असं मी म्हणालो, मात्र तसं झालं नाही. त्याऐवजी शिवसेनेनं दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली,” असं राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावावर भाष्य
उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावावर राजू शेट्टी म्हणाले, “काही तास आधीच उद्धव ठाकरे गट हा माझ्या संपर्कात होता. मला मशाल चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती. मात्र शेतकऱ्यांसाठी चळवळ सुरू ठेवायची आहे. म्हणून मी नकार दिला. राजकारण करायचं असतं तर कधीच राष्ट्रीय पक्षासोबत गेलो असतो”, असं राजू शेट्टी म्हणालेत.
“शिवसेनेचे उमेदवार सत्यजीत आबा पाटील हे कारखाना चालवतात. जर ही निवडणूक लढलो असतो तर शेतकऱी विरूद्ध कारखाना अशी लढत होईल”, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. “शिवसेनेला विरोधकांचा पराभव करायचा होता आणि मला लोकसभा निवडणूक निवडून यायचं होतं,” असं राजू शेट्टी म्हणालेत.
“भाजपने जातीजातीत तेढ आणण्याचं काम केलं आहे. भाजपने शेतकऱ्यांचे काम प्रलंबित ठेवायचं काम केलं आहे. पिकाला हामीभाव आणला नाही. दिल्लीमध्ये वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पण कोणीही लक्ष दिलं नाही,” असंही त्यांनी म्हटलंय.
“शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला तेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी विरोध न होता बोललं जात आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम हे शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याचं”, राजू शेट्टी म्हणाले आहेत.
News Title – Raju Shetty Big Statement About Udhhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या