Manoj Jarange | लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. पुढील काही दिवसांमध्येच मतदान सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील मतदान या महिन्याच्या 19 तारखेपासून सुरु होणार आहेत. अशात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीये. काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत बैठक घेतली होती. यावेळी “आम्ही कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही”, असं जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा वक्तव्य केलंय.
काय म्हणाले जरांगे?
मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुणे शहरातील मराठा समाजाच्या वेगवेगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेत मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं.
त्यानंतर जरांगे आज (08 एप्रिल) रोजी वढू बुद्रुक इथं आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल आपली भूमिका मांडली आहे.
राजकारण माझा मार्ग नाही-
वढू बुद्रुक येथे जरांगेंनी (Manoj Jarange) बैठक घेतली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या वेळेस जरांगे म्हणाले की, ‘मी समाजाला सांगितलं आहे, ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा. पुढे ते म्हणाले, राजकारण हा माझा मार्ग नाही. राज्यात एकही उमेदवार मराठा समाजाने दिला नाही, कोणाला ही पाठिंबा दिला नाही. जो उभा राहील त्याचा तो वैयक्तिक मुद्दा आहे.
समाजाच्या आंदोलनाचा उपयोग कोणी करू नये. पाठिंबा कोणाला नाही मात्र तरीही असे कुणी उभे राहत असेल तर त्याला मराठा समाजाने पाडून टाका, असा आदेशच पाटलांनी दिला.
मराठा समाज विधानसभा लढवणार-
अशातच मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर कुणी उभा राहत असेल तर त्याला पाडा, असा आदेशच जरांगेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मराठा समाज विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असंही जरांगेंनी स्पष्ट केलं.
News Title : manoj jarange talks about loksabha election
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यात धक्कादायक घटना, MPSC करणाऱ्या मुलीने आयुष्य संपवलं, पोलिसांना मात्र वेगळाच संशय!
‘महायुतीत अपमान झाला’; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ
पत्नी बनवायची रिल्स, रिल्सखालच्या कमेंट वाचून पतीनं घेतला हादरुन टाकणारा निर्णय
चेन्नई कोलकाताचा विजयी रथ रोखणार?, आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी?
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर रोहितची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…