मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर ड्रेसिंगरूममध्ये रोहितसोबत घडलं असं काही की…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद दिल्यानं चाहते आजही नाराज आहेत. रोहितचं (Rohit Sharma) कर्णधार पद काढून घेणं हे आजही चाहत्यांना पटलेलं नाही. मात्र हे स्विकारावं लागत आहे. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाची फजिती झाली. मात्र चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने जबरदस्त फलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळत असताना मुंबईने 29 धावांनी विजय मिळवला आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) जरी संघाचा कर्णधार नसला तरीही तो संघाचा लिडर असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने म्हणावी अशी कामगिरी केली नव्हती. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पांड्या यांच्यातील समन्वय व्यवस्थित साधला जात नसल्याच्या बातम्या येत होत्या.

चौथ्या सामन्यामध्ये मुंबईने चांगली कामगिरी केली. मुंबई इंडियन्स संघानं 234 धावा केल्या आणि दिल्लीला 235 धावा जिंकण्यासाठी दिल्या. त्यातून 20 षटकांमध्ये दिल्लीला केवळ 205 धावा करता आल्या. मुंबईच्या विजयाची देशभर चर्चा होतेय. गेल्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंगरूममध्ये कोणत्याही खेळाडूला आनंदी पाहिलं नसल्याचं बोललं जात होतं. मात्र आता यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयामुळे ड्रेसिंगरूम बहरून गेलं आहे.

काय घडलं ड्रेसिंगरूममध्ये?

रोहित शर्मा (Rohit Sharma) जरी सध्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार नसला तरीही रोहितने (Rohit Sharma) संबोधित केलं. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू कायरन पोलार्डने रोहितच्या छातीवर एक बॅज लावला.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“आपण आज फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अशीच आपण पहिल्यापासून फलंदाजीमध्ये कामगिरी करण्याचा आपला प्रयत्न होता. आपण वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघासाठी खेळावं. ज्यामुळे सांघिक गोल निर्माण होईल.”

ही कामगिरी व्हावी याबाबत आपण अनेक दिवसांपासून चर्चा करत आहोत. मात्र ही कामगिरी कोच आणि कर्णधाराला अपेक्षित आहे, असंही तो म्हणाला. रोहित बोलल्यानंतर ड्रेसिंगरूममधील आनंद यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाला.

News title – Rohit Sharma Speech At Dressing Room After First Time Winning

महत्वाच्या बातम्या 

पुण्यात धक्कादायक घटना, MPSC करणाऱ्या मुलीने आयुष्य संपवलं, पोलिसांना मात्र वेगळाच संशय!

‘महायुतीत अपमान झाला’; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ

पत्नी बनवायची रिल्स, रिल्सखालच्या कमेंट वाचून पतीनं घेतला हादरुन टाकणारा निर्णय

चेन्नई कोलकाताचा विजयी रथ रोखणार?, आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी?

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर रोहितची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…