शिखर धवनची पलटण कमिन्सच्या शिलेदारांना रोखणार का?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PBKS vs SRH l आयपीएल 2024 च्या हंगामातील 23 वा सामना पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. पंजाबमधील महाराजा यादविंदर सिंग स्टेडियमवर हा सामना आज होणार आहे. या सामन्यात कोणता संघ बाकी मारेल याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. तर आज आपण पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील खेळपट्ट्यांबाबतचे हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि माहिती जाणून घेऊयात…

महाराजा यादविंदर सिंग स्टेडियमची खेळपट्टी कशी असणार? :

पंजाबच्या महाराजा यादविंदर सिंग स्टेडियम वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आहे, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करतो, या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाज जास्त विकेट घेताना दिसतात. पंजाब किंग्स संघाने येथे 56 सामने खेळले आहेत त्यापैकी 30 सामने जिंकले आहेत.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 21 वेळा सामना झाला आहे, ज्यामध्ये पंजाबचा संघ 7 वेळा, तर हैदराबाद संघ 14 वेळा जिंकला आहे. आतापर्यंत पंजाबला हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 211 धावांची मजल मारता आली आहे. त्याचवेळी पंजाबने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 212 धावांची खेळी केली होती.

PBKS vs SRH l दोन्ही संघांचे संभाव्य शिलेदार :

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (क), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

हवामानाचा विचार केला तर मुल्लानपूर येथे हवामान सामान्य असणार आहे. तसेच पावसाची शक्यता देखील नसणार आहे. तसेच सामन्याच्या सुरुवातीला तापमान 32 अंश असेल आणि सामना संपेपर्यंत तापमानात घट दिसून येईल.

News Title : PBKS vs SRH Head To Head Record

महत्त्वाच्या बातम्या-

गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल

या दोन राशींच्या लोकांना व्यवसायाला यश मिळेल

ऐश्वर्याचा घटस्फोट होणार!, 18 वर्षांचं नातं तोडण्यासाठी दोघे कोर्टात

घराणेशाहीत भाजपचा पहिला नंबर, दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर आहेत ‘हे’ पक्ष!

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर ड्रेसिंगरूममध्ये रोहितसोबत घडलं असं काही की…