मोठी बातमी! अखेर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर, पाहा संपूर्ण यादी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकांमुळे देशासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाने आपल्या जवळपास सर्व जागा जाहीर केल्या आहेत. महायुतीमधील घटक पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट यांनीही आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत.

सर्वच पक्षांनी आपले स्टार प्रचारक देखील जाहीर केले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी नेत्यांच्या भेटी-गाठी आणि प्रचारसभांचा धडाडा सुरू झाला आहे. अशातच आज (9 एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने देखील जागा वाटप जाहीर केलं आहे. आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हे जागा वाटप जाहीर करण्यात आलं.

मविआच्या जागा जाहीर

या पत्रकार परिषदेत (Lok Sabha Election 2024) शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, संजय राऊत उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. ‘आमच्यासोबत अनेक विचाराच्या संघटना आल्या आहेत. त्या सर्वांची आघाडी झाली आहे. अनेकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. काही सोबत आले काही आले नाही. पण आम्ही आता सर्व एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत’, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

पाहा संपूर्ण यादी

कॉँग्रेस पक्ष : कॉँग्रेसला एकूण 17 जागा जाहीर (Lok Sabha Election 2024) झाल्या आहेत. यात नंदूरबार, धुळे अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई नॉर्थ सेंटर, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई या भागांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट) : राष्ट्रवादीला एकूण 10 जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर-दक्षिण, बीड या जागांचा समावेश आहे.

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : शिवसेना ठाकरे गटाला 21 जागा निश्चित झाल्या आहेत. जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातगलंगणे, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, उत्तर-पश्चिम मुंबई, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या जागा आहेत.

News Title- Lok Sabha Election 2024 Mahavikas Aghadi Seat allotment announced

महत्त्वाच्या बातम्या-

टोयोटा कंपनीने ग्राहकांसाठी दिली आनंदाची बातमी

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

फक्त 4000 रुपयांत खरेदी करा जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स

ऋतुराजचा अफलातून रेकॉर्ड; यापूर्वी धोनीने केली होती अशी कामगिरी

IPL पहायची की मालिका???, पती आणि पत्नीमधला संघर्ष पोहोचला टोकाला