फक्त 4000 रुपयांत खरेदी करा जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Motorola Edge 50 Pro 5G | कमी बजेटमध्ये जबरदस्त फीचर्सचा फोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आज (9 एप्रिल) आली आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने नुकताच फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये एक उत्तम स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आजपासून Motorola Edge 50 Pro 5G हा फोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून पहिल्या सेलमध्ये विकला जाणार आहे. कंपनीने यावर काही ऑफर्सदेखील ठेवल्या आहेत.

या फोनच्या 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 31999 रुपये आहे. तर, टॉप व्हेरिएंटची किंमत 35999 रुपये ठेवण्यात आलीये. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर आज पहिल्या सेलपासून खरेदी करणाऱ्याला फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डने पैसे भरल्यास 5% कॅशबॅक देखील मिळेल.

आज दुपारी 12 वाजता हे सेल सुरू होईल. याच्या पहिल्या सेलवर इतरही ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर देखील 2000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. ग्राहक 4000 रुपये प्रति महिना EMI पर्यायासह फोन खरेदी करू शकतात.

Motorola Edge 50 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले आहे, जो HDR10+, 144Hz रिफ्रेश रेट, 2000 nits (पीक) ब्राइटनेस, 1220 x 2712 पिक्सेल रिझोल्यूशन, 20:9 अॅस्पेक्ट रेशोला सपोर्ट करतो. याच्या डिस्प्ले कॉर्निंगला गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शनदेखील आहे.

फोनमध्ये परफॉर्मेंससाठी 4nm ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 चिपसेट बसवण्यात आलं आहे. याला Adreno 720 GPU सह जोडण्यात आले आहेत. यात बॅक पॅनलवर 50MP f/1.4, (wide) OIS सोबत प्रायमरी कॅमेरा, 10MP टेलीफोटो लेंस आणि 13MP चे सेंसर आहे. सेल्फीसाठी खास 4K@30fps 50MP चा कॅमेरा देखील आहे.

या फोनमध्ये 4500 mAh ची बॅटरी असून ती 125W wired चार्जिंगला सपोर्ट करते. यामुळे फक्त 18 मिनटमध्ये मोबाइल 100 टक्के चार्ज होतो. यासोबतच 50w वायरलेस आणि 10w रिवर्स चार्जिंगही मिळेल. या फोनला तुम्ही Luxe Lavender, Black Beauty आणि Moonlight Pearl कलरमध्ये खरेदी करू शकता. यात Wi-Fi 802.11, ब्लूटूथ 5.4, GPS, GLONASS, GALILEO, BDS, NFC सपोर्टदेखील मिळेल.

News Title- Motorola Edge 50 Pro 5G sale on today

महत्त्वाच्या बातम्या-

सर जडेजाने केला नवा विक्रम; हा पराक्रम आजपर्यंत कोणालाही करता आला नाही

शिखर धवनची पलटण कमिन्सच्या शिलेदारांना रोखणार का?

गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल

या दोन राशींच्या लोकांना व्यवसायाला यश मिळेल

ऐश्वर्याचा घटस्फोट होणार!, 18 वर्षांचं नातं तोडण्यासाठी दोघे कोर्टात