ऋतुराजचा अफलातून रेकॉर्ड; यापूर्वी धोनीने केली होती अशी कामगिरी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CSK vs KKR | सलग दोन पराभवानंतर अखेर चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळाला. चेन्नईने कोलकाताविरुद्धचा सामना जिंकत पुन्हा विजयी सुरुवात केली. चेन्नईचा हा 5 सामन्यांमधील तिसरा विजय ठरला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने अनोखा विक्रम केला.

कोलकाताने विजयासाठी दिलेल्या 138 धावांचं आव्हान चेन्नईने ऋतुराजच्या नाबाद 67 धावांच्या जोरावर 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऋतुराजने या 67 धावांच्या खेळीत 9 चौकार ठोकले. त्याने संघाला विजय मिळवून देण्यासह कॅप्टन म्हणून खास रेकॉर्डही केला आहे.

ऋतुराज गायकवाडचा अनोखा विक्रम

ऋतुराज चेन्नई सुपर किंग्सकडून गेल्या 5 वर्षात अर्धशतक करणारा पहिला कर्णधार ठरला आहे. ऋतुराजच्या अगोदर महेंद्रसिंह धोनी याने ही कामगिरी केली होती. ऋतुराजने कोलकाता विरुद्ध 45 बॉलमध्ये 111.11 च्या स्ट्राईक रेटने 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. धोनीने ऋतुराजला कॅप्टन्सी सोपवल्यानंतर त्याला मोठी खेळी करता आली नाही. पण, कोलकाताविरुद्ध (CSK vs KKR) झालेल्या कालच्या (8 एप्रिल) सामन्यात त्याला अखेर सूर गवसला.

दरम्यान, चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये 6 पॉइंट्ससह चौथ्या स्थानी आहे. चेन्नईचा नेट रनरेट हा +0.666 इतका आहे. चेन्नईचा पुढील सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध 14 एप्रिल रोजी होईल. सध्या पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. 4 सामन्यांत 4 विजय मिळवून 8 गुणांसह हा संघ अव्वल स्थानावर कायम आहे. आता या स्पर्धेत राजस्थानचा संघ एकमेव संघ आहे. ज्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

CSK vs KKR प्लेइंग ईलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.

News Title :  CSK vs KKR Ruturaj Gaikwad Becomes first Csk Captain In 5 Years To Score An Ipl Fifty

महत्त्वाच्या बातम्या-

सर जडेजाने केला नवा विक्रम; हा पराक्रम आजपर्यंत कोणालाही करता आला नाही

शिखर धवनची पलटण कमिन्सच्या शिलेदारांना रोखणार का?

गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल

या दोन राशींच्या लोकांना व्यवसायाला यश मिळेल

ऐश्वर्याचा घटस्फोट होणार!, 18 वर्षांचं नातं तोडण्यासाठी दोघे कोर्टात