IPL पहायची की मालिका???, पती आणि पत्नीमधला संघर्ष पोहोचला टोकाला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएल 2024 (IPL 2024) हंगाम सुरू आहे. जिकडं तिकडं क्रिकेट रसिक आयपीएलचा (IPL 2024) आनंद घेत आहेत. क्रिकेट रसिकांसाठी आयपीएल जणू एखाद्या सणाप्रमाणे आहे. अनेकदा आपला संघ पराभूत झाला तर ती गोष्ट क्रिकेट रसिक मनाला लावून बसतात. आयपीएल (IPL 2024) सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेतलं. त्यामुळे अनेक चाहत्यांच्या जिव्हारी लागलं. यावरून आयपीएलच्या (IPL 2024) चाहत्यांची खेळाप्रती भावना दिसून येते. याच आयपीएलमुळे एका कुटुंबात पती आणि पत्नीमध्ये बिनसलं आहे. पती आणि पत्नीमध्ये आयपीएल (IPL 2024) पाहायची की मालिका यावरून वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

काय घडलं नेमकं?

आग्रा येथे आयपीएलवरून एका कुटुंबात झालेल्या कलहामुळे हसावं की रडावं हे कळत नाही. पती आणि पत्नीमध्ये आयपीएल पाहायची का मालिका यावरून वाद झाला. हा वाद नंतर शिगेला पोहोचला. पत्नीला मालिका पाहायची होती आणि पतीला आयपीएल पाहायची होती. मात्र घरामध्ये एकच टीव्ही असल्याने एका टीव्हीवर दोघांच्या इच्छा पूर्ण होणं अशक्य होतं.

आयपीएलचा चाहता असलेला पती दररोज आयपीएलचे सामने पाहत असत. पत्नीला आपली आवडती मालिका पाहायला मिळत नव्हती. यामुळे पत्नीने तक्रार करत पतीच्या हातून रिमोट हिसकावून घेतला. ती भांडणं थेट काउंसलरकडे पोहोचली. काउंसलर येथील एका अधिकाऱ्याने कार्यालयामध्ये बोलावलं.

कौटुंबिक कलह म्हणायचा की आणखी काही…

कार्यालयामध्ये पोहोचल्यावर पत्नीने सांगितलं की, पती रोज आयपीएल मॅच पाहत असतो. रिमोट देखील त्यांच्याच हातात असतो. त्याचवेळी माझीही मालिका लागते. मी रिमोट मागायला जाते तर वाद होतो. असं म्हणत पत्नीने आपली बाजू काउंसलर कार्यालयामध्ये मांडली आहे.

पतीने आपल्या पत्नीविरोधात सांगितलं की, मालिका सुरूच असते. पण आयपीएल वर्षातून एकदा येते. त्यामुळे मी आयपीएलचे सामने पाहतो. काउंसलरने दोघांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर समजोता केला. मालिका सुरू होताच पत्नीच्या हातात रिमोट सोपवा. मालिका संपताच आयपीएल पाहा असा सल्ला काउंसलरने दिला.

News Title – IPL 2024 Husband And Wife Fight About Tv Serial And IPL Match

महत्त्वाच्या बातम्या

ऐश्वर्याचा घटस्फोट होणार!, 18 वर्षांचं नातं तोडण्यासाठी दोघे कोर्टात

घराणेशाहीत भाजपचा पहिला नंबर, दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर आहेत ‘हे’ पक्ष!

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर ड्रेसिंगरूममध्ये रोहितसोबत घडलं असं काही की…

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘मला ऑफर दिली, पण…’; राजू शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट