एकनाथ खडसेंना धक्का!, एकनाथ शिंदेंच्या पाठिराख्याने वाढवल्या अडचणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Khadase | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. अशातच आता आणखी एक मोठी अपडेट एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांच्याबाबत समोर आलीये. एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी त्यांच्या जागेतून अवैध खनिजांचे उत्खनन केलं. यामुळे विशेष एसआयटी स्थापन करण्यात आली होती. नंतर एसआयटीला स्थगिती देण्यात आली. याप्रकारणाला आव्हान देणारी याचिका शिंदे सरकारला पाठिंबा दिलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दाखल केली.

याप्रकरणी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. आर. एम. जोशी यांनी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, मंदाकिनी खडसे, रक्षा खडसे, राज्य शासन, नाशिकचे विभागीय आयुक्त, जळगावचे जिल्हाधिकारी, भुसावळचे उपविभागीय अधिकारी यांना नोटीस बजावली आहे.

अवैध खनिजांचे उत्खनन

आमदार एकनाथ खडसे यांच्या मालकिची मुक्ताईनगरमध्ये जमीन आहे. त्या जमीनीतून तब्बल 202 ब्रास गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन करण्यात आल्याचा मुद्दा चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात तारांकीत प्रश्नांद्वारे उपस्थित केला. याचप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली. एसआय़टीच्या अहवालानंतर 175 कोटींचा दंड आकारण्यात आला.

या आदेशाला खडसे यांनी खंडपीठामध्ये आव्हान दिलं. त्यांना शासनाकडे अपिल करण्यात मुभा देण्यात आली. अपिलात शासनाने एसआयटीला आणि कारवाईला स्थगिती दिली. नैसर्गिक तत्व आणि न्यायाचा भंग झाल्यानं खडसे यांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली नाही. याप्रकरणाबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी केली.

पुढील सुनावणी 30 एप्रिल

पाटील यांच्या वतीने राजेंद्र देशमुख यांनी एक मुद्दा उपस्थित केला. शासनाने कारवाईचा अहवाल स्वीकारून कारवाई प्रस्थापित केली असून त्यावर पुन्हा स्थगिती देणं संयुक्तिक नाही. त्यावर खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. यानंतर पुढील सुनावणी ही 30 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title – Eknath Khadase Muktai Nagar MLA Chandrakant Patil News Update About Mineral Mining

महत्त्वाच्या बातम्या

सर जडेजाने केला नवा विक्रम; हा पराक्रम आजपर्यंत कोणालाही करता आला नाही

शिखर धवनची पलटण कमिन्सच्या शिलेदारांना रोखणार का?

गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल

या दोन राशींच्या लोकांना व्यवसायाला यश मिळेल

ऐश्वर्याचा घटस्फोट होणार!, 18 वर्षांचं नातं तोडण्यासाठी दोघे कोर्टात