काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एक बडा नेता शिंदे गटात!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raju Waghmare | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदे गटामध्ये इनकनिंग सुरूये. तर काँग्रेस पक्षातून आऊटगोईंग सुरू आहे. काही दिवसांआधी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सिद्दीकी यांनी देखील काँग्रेस सोडला सोडचिठ्ठी दिली. अशातच आता काँग्रेस पक्षाचा तगडा नेता काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी आपल्या हातामध्ये भगवा ध्वज घेत शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय.

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) हे अनेक वर्षांपासून आपल्या पक्षाची बाजू माध्यमांसमोर मांडत होते. त्यानंतर आता तेच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हातामध्ये भगवा ध्वज देत आपल्या पक्षामध्ये सामिल करून घेतलं आहे. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.

काय म्हणाले राजू वाघमारे?

राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. “काँग्रेस पक्षाची अवस्था वाईट झाली. काँग्रेस हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली दबलेला पक्ष आहे. सांगली आणि भिवंडीच्या जागेबाबत असाच एक निर्णय झाला. सांगलीच्या जागेवर शिवसेनेनं जाहीर केली. तर भिवंडी जागा शरद पवार गटाने घेतली. याचा परिणाम माझ्यावर झाला आहे.”

“मी काॅमन मॅन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहे. एकनाथ शिंदे यांनी विकास काय आहे हे राज्यातील लोकांना कमी कालावधीतच दाखवून दिलं आहे. आतापर्यंत असं कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी काम केलं नाही. हे विरोधकांनी मान्य करावं.”

लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काँग्रेसमध्ये असताना राजू वाघामारे (Raju Waghmare) यांच्याकडे एक सर्व्हे आला होता. त्या सर्व्हेमध्ये लोकांचे आवडते मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत, लाखो कार्यकर्ते त्यांच्या मागे आहेत. ते एअर कंडीशनमध्ये बसणारे नाहीत. सर्वसामान्य मुख्यमंत्री आहेत.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. “राज्यामध्ये काँग्रेसचा ना झेंडा ना अजेंडा राहिला. 35 वर्षे राज्याचं राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्षाचे काम केलं. मात्र त्यांची घुसमट होत होती. त्यांनी आता योग्य निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक प्रकल्प थांबले होते. आता जोरदार काम सुरू आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

News Title – Raju Waghmare Enter In Shivsena Shinde Group

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

फक्त 4000 रुपयांत खरेदी करा जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स

ऋतुराजचा अफलातून रेकॉर्ड; यापूर्वी धोनीने केली होती अशी कामगिरी

IPL पहायची की मालिका???, पती आणि पत्नीमधला संघर्ष पोहोचला टोकाला

सर जडेजाने केला नवा विक्रम; हा पराक्रम आजपर्यंत कोणालाही करता आला नाही