पुणे हादरलं! समोस्यांमध्ये गुटखा, तंबाखू, कंडोम भरलं, कारण ऐकून बसेल धक्का

Pune News | पुण्यामध्ये (Pune News) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गुटखा, तंबाखू, दगड आणि कंडोम समोस्यामध्ये भरून ते समोसे एका कर्मचाऱ्याला देण्यात आले. एका कॅन्टिनमधून हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅन्टिनमध्ये कर्मचारी आला असता त्याला अशा स्वरूपाचे समोसे देण्यात आले. अशी माहिती एका माध्यमाने दिली आहे.

पुण्यात (Pune News) एक धक्कादायक प्रकार घडला. गुटखा, तंबाखू, कंडोम भरलेले समोसे एका कॅन्टिनमध्ये आलेल्या कर्मचाऱ्याला देण्यात आले. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. पोलीस याप्रकऱणाचा तपास करत आहेत. व्यवसाय आणि कंपनीवरचा राग यातून हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला

पुण्यातील (Pune News) पिंपरी चिंचवड येथे ऑटोमोबाईलच्या कॅन्टिनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅन्टिनने खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या एका कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून दुसऱ्या कंत्राटदराला कंत्राट देण्यात आलं. त्यानंतर शनिवारी ऑटोमोबाईलच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार केली.

समोस्यामध्ये गुटखा, तंबाखू आणि दगड मिसळल्याची तक्रार केली. यावेळी तक्रारदाने तक्रार केली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांवर संशय व्यक्त केला. त्याचवेळी समोस्यामध्ये दगड, गुटखा आणि कंडोम आढळून आले. (Pune News)

धक्कादायक प्रकार घडण्याचं कारण आलं समोर

27 मार्च रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. तेव्हा कर्मचारी कॅन्टिनमध्ये समोसा खात होते. त्यावेळी त्या समोस्यात दगड, तंबाखू, गुटखा, पान मसाला आढळून आले. हा धक्कादायक प्रकार रागातून घडला असल्याची प्रथमिक माहितीतून समोर आलं. (Pune News)

समोस्यामध्ये काही तरी मिसळून कंत्राटदाराला बदनाम करण्याचा प्रयत्न होता. अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Pune News Very Shocking Incidence Gutkha, Stone, Condoms In Samosa

महत्त्वाच्या बातम्या

सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने घेतला मोठा निर्णय!

‘अशा’ मुली प्रेमाच्या बाबतीत खूप लकी असतात; जीवनात यांना सर्वकाही सहज मिळून जातं

एकनाथ खडसेंना धक्का!, एकनाथ शिंदेंच्या पाठिराख्याने वाढवल्या अडचणी

मोठी बातमी! अखेर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर, पाहा संपूर्ण यादी

मोठी बातमी! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना महत्त्वाचा इशारा