सीमा हैदर आणि सचिनचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Seema Haider | पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) आणि भारताचा सचिन मीना (Sachin Meena) यांच्या प्रेमकहाणीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. प्रेमासाठी भारतात पळून आल्यापासून सीमा हैदर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. दरम्यान आता सीमा आणि सचिन यांच्या प्रेमकहाणीवर एक चित्रपट येणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. एवढंच नाही तर सीमाला चक्क राजकारणातूनच ऑफर आल्याचं देखील म्हटलं होतं. दरम्यान, सध्या चर्चा आहे ती सीमा आणि सचिनच्या व्हिडीओची.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु होती. सचिन आणि सीमा (Seema Haider) यांच्यात मतभेद झाल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाहीतर या दोघांचे वाद अक्षरशः मारामारीपर्यंत गेल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, सोशल मीडियावर सीमा हैदरचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये सीमाला बेदम माहरण केल्याचा दावा करण्यात आला आहे.

X वर व्हिडीओ व्हायरल-

सीमा (Seema Haider) आणि सचिन यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सीमा रडताना दिसत आहे. एवढंच नाहीतर सीमाच्या चेहऱ्यावर आणि हातावर मारल्याचे डाग दिसत आहेत. सीमाचे डोळे देखील सुजलेले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी सीमाला मारहाण झाल्याचा दावा केला आहे.

सीमाच्या वकिलांनी दिली माहिती-

सीमा आणि सचिनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर, सीमाचे वकिल यांनी यावर प्रतिक्रिया दिली. अॅड एपी सिंह म्हणाले की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा खोटा आहे. हा व्हिडीओ AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने त्यार करण्यात आला आहे. याचा सीमाशी काही एक संबंध नाही.

News Title : seema haider video gets viral

महत्त्वाच्या बातम्या-

मुलगी आराध्याबदल ऐश्वर्या रायने केलं मोठं विधान!, सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एक बडा नेता शिंदे गटात!

सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने घेतला मोठा निर्णय!

‘अशा’ मुली प्रेमाच्या बाबतीत खूप लकी असतात; जीवनात यांना सर्वकाही सहज मिळून जातं

एकनाथ खडसेंना धक्का!, एकनाथ शिंदेंच्या पाठिराख्याने वाढवल्या अडचणी