“येणाऱ्या निवडणुकीत पवार आडनावाला मत द्या”, अजित पवार यांचं आवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | राज्यात गुढीपाडवा सण साजरा केला जात आहे. नेते मंडळी धावपळीत असले तरीही सण-उत्सव टाळत नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांचे मूळ गाव बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या काटेवाडीत जात गुढी उभारत सण साजरा केला. त्यानंतर ते आपल्या गावामध्ये जात मतदारांच्या भेटी घेत आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही उपस्थित होते.

गुढीपाडव्याचं औचित्य साधून अजित पवार (Ajit Pawar) यांनी मतदारांची भेट घेतली. त्यांनी आपल्या काटेवाडी गावातील ग्रामस्थांसोबत बातचीत केली. यावेळी बोलत असताना त्यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर भाष्य केलं. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा आणि प्रचारावर देखील त्यांनी भाष्य केलंय. त्यावेळी बोलत असताना त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत पवार आडनावाला मत द्या, असं आवाहन केलं.

सुनेत्रा पवार अर्ज करणार

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या येत्या 18 तारखेला उमेदवारीचा अर्ज भरणार आहे. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) हे शिरूर, बारामती, मावळ लोकसभा मतदारसंघाचा अर्ज भरणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी बारामतीतील पदाधिकाऱ्यांना येण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

“येणाऱ्या निवडणुकीत पवार आडनावाला मत द्या”

बारामती लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्याची तारीख समोर आलीये. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी सर्व पदाधिराकाऱ्यांना अर्ज भरण्यासाठी येण्याचं आवाहन केलं. त्यानंतर आता अजित पवार यांनी “आतापर्यंत पवारांच्या मागे उभे राहिलात. आता पण पवारांच्या मागे उभं राहा. येणाऱ्या निवडणुकीत पवार आडनावाला मत द्या. पहिलं साहेब, नंतर पुतण्या, नंतर लेक आणि आता सुनेला मत द्या म्हणजे कोणीही नाराज होणार नाही”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

“सर्वांचं व्हिजन होतं, म्हणून बारामतीमध्ये विकास झाला. 10 वर्षांमध्ये मोदींनी कधीही सुट्टी नाही घेतली नाही. अर्थव्यवस्था आणण्याचे मोदींचे प्रयत्न आहेत. सर्व रस्त्यांची कामं सुरू आहेत. त्याला केंद्राचा पैसा वापरला जात आहे. राजकारणात कोणीही कुणाचे शत्रू नसते आणि मित्र नसते.

उद्योगपतींच्या कार्यक्रमात मोदींना सांगितलं की मी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर असे निर्णय घेईल की ते देशातील लोकांच्या स्मरणात राहिल. मोदी हे सर्व व्हिजन असलेलं नेतृत्व आहे,” असं अजित पवार म्हणालेत.

News Title – Ajit Pawar convince To Baramatikar About Vote To Only Pawar Surname

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसला समजूतदारपणा नडणार का?; ‘या’ दोन नेत्यांनी टेंशन वाढवलं

पुणे हादरलं! समोस्यांमध्ये गुटखा, तंबाखू, कंडोम भरलं, कारण ऐकून बसेल धक्का

सीमा हैदर आणि सचिनचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

मुलगी आराध्याबदल ऐश्वर्या रायने केलं मोठं विधान!, सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एक बडा नेता शिंदे गटात!