Navratri 2024 | यंदा चैत्र नवरात्रीचे उपवास 9 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत असतील. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीची 9 वेगवेगळ्या रूपात पूजा करण्यात येते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये रंगांना काही विशेष महत्त्व असते. असं म्हटलं जातं की, या दिवसांत हे नवरंग परिधान केल्यास देवी प्रसन्न होते.
हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. त्यामुळे या नऊ दिवसांत देवीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते आणि हे नऊ रंग कोणते, याबाबत या लेखात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
नवरात्रीचे ‘नवरंग’ कोणते?
पहिला दिवस : आज 9 एप्रिल मंगळवार, चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी माता दुर्गाची शैलपुत्री म्हणजेच हिमालयाची कन्या या रूपात पूजा केली जाते. माता शैलपुत्रीचा आवडता रंग पिवळा आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते.
दुसरा दिवस : 10 एप्रिल नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जीवनात विकास आणि यशप्राप्तीसाठी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्मदेवाने सांगितलेले आचरण पाळणारी. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. त्यामुळे या दिवशी हिरवे कपडे घालावेत.
तिसरा दिवस : 11 एप्रिल गुरुवार, चैत्र नवरात्रीच्या (Navratri 2024) तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा करतात. चंद्रघंटाचा आवडता रंग तपकिरी आहे.त्यामुळे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तपकिरी रंगाचे कपडे घालणे शुभ असते.
चौथा दिवस : 12 एप्रिल शुक्रवार, चैत्र नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी दुर्गाचे चौथे रूप माता कुष्मांडाची पूजा केली जाते.ही देवी भीती दूर करते. भीती हा यशाचा सर्वात मोठा अडथळा मानला जातो. देवी कुष्मांडाचा आवडता रंग केशरी मानला जातो. या दिवशी केशरी रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
पाचवा दिवस : 13 एप्रिल शनिवार, चैत्र नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. ही देवी शक्ती दाता मानली जाते. त्यांची पूजा केल्याने भक्तांना त्यांच्या कार्यात यश मिळण्याची शक्ती मिळते. स्कंदमातेला पांढरा रंग आवडतो. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
सहावा दिवस : 14 एप्रिल रविवार, चैत्र नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनीची पूजा केली जाते. ही आरोग्याची देवी आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी निरोगी शरीर आवश्यक आहे. दुर्गा मातेच्या या रूपाची पूजा करून भक्त त्यांच्या आरोग्याची कामना करतात.देवी कात्यायनीला लाल रंग आवडतो. या दिवशी भाविकांनी लाल वस्त्र परिधान करावे.
सातवा दिवस : 15 एप्रिल सोमवार, चैत्र नवरात्रीचा 7 वा दिवस हा कालरात्रीचा असतो. हे दुर्गा देवीचे 7 वे रूप आहे. रात्रीच्या साधनेने प्राप्त होणारी सर्व सिद्धी देणारी माता म्हणजे कालरात्री. त्यांची पूजा नवरात्रीच्या सातव्या दिवशी असते. माता कालरात्रीला निळा रंग आवडतो. या दिवशी निळे कपडे घालावेत.
आठवा दिवस : 16 एप्रिल मंगळवार, चैत्र नवरात्रीच्या (Navratri 2024) 8 व्या दिवशी देवी दुर्गेचे 8 वे रूप महागौरीची पूजा केली जाते. महागौरीला गुलाबी रंग खूप आवडतो. या दिवशी भक्तांनी गुलाबी वस्त्रे परिधान करणे शुभ असते.
नववा दिवस : 17 एप्रिल बुधवारी, चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. देवी सिद्धिदात्रीला जांभळा रंग खूप आवडतो. या दिवशी भक्तांनी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
News Title- Navratri 2024 colors list
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! अखेर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर, पाहा संपूर्ण यादी
मोठी बातमी! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना महत्त्वाचा इशारा
गोविंदा पाठोपाठ संजय दत्तही राजकारणात कमबॅक करणार?, मोठी माहिती समोर
टोयोटा कंपनीने ग्राहकांसाठी दिली आनंदाची बातमी
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु