गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात?, जाणून घ्या कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gudi Padwa 2024 | आज 9 एप्रिलरोजी संपूर्ण महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा सण साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजेच मराठी नवं वर्षाची सुरुवात ही गुढी उभारुन करण्यात येते. या दिवशी दारोदारी रांगोळी, दाराला आंब्याची आणि अशोकाची पाने यापासून बनवलेली तोरणे लावली जातात. याशिवाय या दिवशी कडुलिंब आणि गूळ नक्कीच खातात. कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे.

पण, या सणाला कडुलिंब आणि गूळच का खातात?, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर या लेखात दिले आहे. या काळात हवामानात अनेक बदल होत असतात. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे अनेक आजारही जडतात. कडुलिंब आणि गूळ हे आनंद आणि दुःखाचे प्रतीक आहे, असे मानले जाते.पण प्रत्यक्षात, कडुलिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हीला फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर.

कडुलिंब खाण्याचे फायदे

वातावरणातील बदलामुळे त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी-खोकला आदी आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा वातावरणात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नवीन वर्षाच्या (Gudi Padwa 2024 ) सुरुवातीला कडू लिंबाचे सेवन केले जाते.

कडुलिंब या सगळ्या समस्यांवर मात करण्यास मदत करते. कडुलिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. कडुलिंब हे मधुमेह नियंत्रणात प्रभावी आहे. त्यामुळे या दिवशी कडुलिंब खाण्याची प्रथा आहे. कडुलिंब हे पोटाच्या समस्यादेखील दूर करते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी, केसांतील कोंडा, केस गळणे, खाज सुटणे, पुरळ येणे इत्यादीपासून आराम मिळवून देण्यासाठी कडुलिंब खूप फायदेशीर ठरते.

गुळ खाण्याचे फायदे

होळी दहननंतर वातावरणमध्ये अनेक बदल होतात. अशा काळात शरीराची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी होऊन जाते. अशात गूळ खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. गुळामुळे पचनक्रिया सुधारते.यामुळे ॲसिडिटीची शक्यता कमी होते.गुळामध्ये खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि इतर अनेक पौष्टिक घटक असतात.

या काळात श्वसनाचे आजार अधिक उद्भवतात, त्यांच्याशी लढण्यासाठी गूळ खूप उपयुक्त आणि प्रभावी असते. गुळाचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच सौंदर्यदेखील निखारते.गुळामध्ये असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा सुधारते. त्यामुळे गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa 2024 ) सणाला गूळ आणि कडुलिंब आवर्जून खाल्ले जाते.

News Title : Gudi Padwa 2024 Benefits of eating neem and jaggery

महत्त्वाच्या बातम्या-

फक्त 4000 रुपयांत खरेदी करा जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स

ऋतुराजचा अफलातून रेकॉर्ड; यापूर्वी धोनीने केली होती अशी कामगिरी

IPL पहायची की मालिका???, पती आणि पत्नीमधला संघर्ष पोहोचला टोकाला

सर जडेजाने केला नवा विक्रम; हा पराक्रम आजपर्यंत कोणालाही करता आला नाही

शिखर धवनची पलटण कमिन्सच्या शिलेदारांना रोखणार का?