मराठी पाट्या नसल्यास होणार मोठी कारवाई, अंमलबजावणीची तारीख आली समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Muncipal Corporation | मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Muncipal Corporation) गेल्या काही महिन्यांआधी दुकान आणि अस्थापनांच्या पाट्यांवर मराठी देवनागरी भाषेचा उल्लेख असावा असा आदेश दिला होता. मात्र काही दुकान मालकांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या नव्हत्या. यामुळे आता महापालिकेने (Mumbai Muncipal Corporation) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांना आता 1 मे पासून मालमत्ता कर दुप्पट करण्याबाबत महापालिकेनं निर्णय घेतला. तसेच ज्यांनी आजही मराठी पाट्या लावल्या नाहीत त्यांना वैयक्तिक स्वरूपात पालिका पत्र पाठवणार असल्याची माहिती समोर आलीये. (Mumbai Muncipal Corporation)

मराठी फलकाबाबत मोठी अपडेट

जो दुकान मालक आपल्या दुकानांच्या बाहेर तसेच आपल्या अस्थापनांच्या फलकांवर मराठी देवनागरी भाषेमध्ये पाट्या लावत नाही, त्यांच्या मालमत्ता करात दुप्पटीने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे (Mumbai Muncipal Corporation) आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी आढावा बैठकीनंतर दिली.

दुकानांवर मराठी फलक न लावणाऱ्यांना मोठा फटका

दुकाने आणि अस्थापनांवर मराठी फलक न लावणाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. फलकावर मराठी देवनागरी लिपित पाट्या लावण्याबाबत दोन महिने महापालिकेनं वेळ दिला होता. 25 सप्टेंबर 2023 ही अंतिम तारीख होती. 28 सप्टेंबर 2023 पासून तपास करायला सुरूवात केली. 31 मार्चपर्यंत 87.047 पैकी 84 हजार 007 दुकाने आणि अस्थापनांनी मराठी पाट्या लावल्याचं आढळून आलं. 3,040 अस्थापनांना कायदेशीर कारवाई नोटीस बजावण्यात आली.

मराठी पांट्यांसंदर्भात न्यायालयामध्ये 1 हजार 928 प्रकरणं दाखल झाली असून 177 व्यवसायिकांना 13 लाख 49 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. 1 हजार 751 प्रकरणांची सुनावणी प्रलंबित आहे. तर सुनावणीसाठी आलेल्या 916 पैकी 343 प्रकरणं निघाल्याची माहिती समोर आली. यातून आता 31 लाख 86 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.

मराठी नामफलक नसेल तर प्रकाशित फलकासाठी दिलेला परवाना रद्द करण्यात येईल. यासाठी नवीन परवाना मिळवणे, फलक तयार करणे या संबंधीत अस्थापनधारकांना 25 हजार ते दिड लाख रूपये दंड सोसावा लागणार आहे.

News Title – Mumbai Muncipal Corporation Announce About Marathi Board

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसला समजूतदारपणा नडणार का?; ‘या’ दोन नेत्यांनी टेंशन वाढवलं

पुणे हादरलं! समोस्यांमध्ये गुटखा, तंबाखू, कंडोम भरलं, कारण ऐकून बसेल धक्का

सीमा हैदर आणि सचिनचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

मुलगी आराध्याबदल ऐश्वर्या रायने केलं मोठं विधान!, सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एक बडा नेता शिंदे गटात!