मोठी बातमी! फक्त मोदींसाठी राज ठाकरेंचा भाजपला बिनशर्त पाठिंबा

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतिर्थावर गुढीपाडवा मेळावा घेत काही गोष्टींबाबत खुलासे केले आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाहा यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान राज ठाकरेंनी अमित शाहा यांना भेटण्यामागचं कारण देखील सांगितलं. यावेळी बोलत असताना त्यांनी चिन्ह आणि लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

सभेत बोलत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, जागा वाटपाबदल आमच्यामध्ये चर्चा झाली होती. शिवाय, मला असं सांगितलं की, आमच्या निशाण्यावर लढा म्हणजे कमळावर लढा. मी शेवटच्या जागा वाटपाच्या चर्चेला 1985 ला बसलो होतो. त्यानंतर मी कधीच चर्चेला बसलेलो नाही. दोन तू घे, चार मला दे, दोन तू घे, मला ते जमत नाही. मला ते जमणार नाही, आणि माझ्याकडून होणार नाही. हे रेल्वे इंजिन आहे ना हे तुमच्या कष्टाने कमावलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलेलं नाही. सहज आलंय म्हणून लढवायचं अजिबात नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

चिन्हाबाबत कॅाम्प्रमाईज करणार नाही- राज ठाकरे

अमित शहा यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. दिल्लीला गेलेले ठाकरे (Raj Thackeray) पहिलेच. पत्रकारांना माहीत नसतं. जुन्या गोष्टी माहित नसतात. 1980 साली बाळासाहेब ठाकरे, दिल्लीला इंदिरा गांधी, संजय गांधींना भेटायला गेले होते, असंही त्यांनी सांगितलं.

भेटायला जायला काय प्रॉब्लेम आहे. मला अनेक लोक भेटायला येत असतात. मी काय समजायचं, अनेक लोक भेटत असतात. त्यात मोठेपणा कमीपणा कुठून आला.या वेळी चिन्हाबाबत देखील चर्चा झाली. त्यावेळी मी म्हणालो, चिन्हावर कॉम्प्रमाईज होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

नरेंद्र मोदींना पाठिंबा देतो-

पुढे ते म्हणाले की, “या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेंचा पाठिंबा आहे. मनसेचा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर करत आहे.”

News Title : Raj Thackeray About Bjp Symbol

महत्त्वाच्या बातम्या-

मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, मी मनसेचाच अध्यक्ष राहणार- राज ठाकरे

दिल्लीत नेमकं काय झालं?; राज ठाकरे यांचा सर्वात मोठा खुलासा

‘…त्या काय मतदारांच्या डायपर बदलणार आहेत का?’; राज ठाकरे भडकले

मराठी पाट्या नसल्यास होणार मोठी कारवाई, अंमलबजावणीची तारीख आली समोर

गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात?, जाणून घ्या कारण