दिल्लीत नेमकं काय झालं?; राज ठाकरे यांचा सर्वात मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray MNS Gudi Padwa | मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरेंनी मोठा खुलासा केलाय.

“लपवून ठेवणारा नेता मी नाही”

अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं योग्य वेळी सर्व मांडेन. माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, करावीच लागेल लपवून ठेवणारा नेता मी नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

वाट्टेल त्या बातम्या सुरू होत्या. मी एन्जॉय करत होतो. काय बोलायचे ते बोला. मला वाटेल तेव्हा बोलेन. अमित शाह यांना भेटायला गेलो. त्यावेळी ते आणि मी होतो. तुम्हाला कुठून कळलं. मी दिल्लीत पोहोचलो काय. राज ठाकरेंना १२ तास थांबायची वेळ आली. अरे गधड्या दुसऱ्या दिवशीची बैठक होती. आदल्या दिवशी पोहोचलो. त्यात थांबायचं काय आलं, असं सांगत राज ठाकरेंनी माध्यमांना सुनावलं.

मी अमित शहांना भेटल्यानंतर…- राज ठाकरे

मी अमित शहांना भेटल्यानंतर… 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. 2014 ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान होण्याआधी, 2019 ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान झाल्यानंतर… ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात, असंही राज ठाकरे म्हणाले.

तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका… मी जे अपत्य जन्माला घातलं आहे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ तेच मी वाढवणार… मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…त्या काय मतदारांच्या डायपर बदलणार आहेत का?’; राज ठाकरे भडकले

मराठी पाट्या नसल्यास होणार मोठी कारवाई, अंमलबजावणीची तारीख आली समोर

गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात?, जाणून घ्या कारण

यंदाच्या चैत्र नवरात्रीसाठी ‘हे’ आहेत नऊ रंग; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

“येणाऱ्या निवडणुकीत पवार आडनावाला मत द्या”, अजित पवार यांचं आवाहन