मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, मी मनसेचाच अध्यक्ष राहणार- राज ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरे (Raj Thackeray) करणार, अशी चर्चा सुरु झालेली. या चर्चेवर आज अखेर राज ठाकरे यांनी मौन सोडलंय. शिवसेनेचे प्रमुख व्हायचं असते तर आधीत झालो असतो. पक्ष फोडून मला कोणतीही गोष्ट करणार नाही. मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. मी फक्त शिवसेनाप्रमुखांच्या हाताखालीच काम केले. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) स्पष्ट केलंय.

“मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार”

तेव्हा 32 आमदार सहा-सात खासदार म्हणाले. आपण एकत्र बाहेर पडू. माझा दौरा सुरू केला. त्यांना वाटलं मी काँग्रेसमध्ये जाईन. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं की, मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. आता माझ्या मनात विचार नाही. उद्या पाऊल उचललं तर स्वत:चा पक्ष काढेन. पण मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी मनात खुणगाठ बांधली होती, असंही राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटलंय.

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती. समजलंच नाही. जाऊन दे. तो झाला भूतकाळ. त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका, असं त्यांनी म्हटलंय.

मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष होणार नाही. मी जे मनसे नावाचं अपत्य जन्माला घातलंय त्याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. 18 वर्ष झाली. असली गोष्ट मनाला शिवतही नाही. मी हसत होतो. त्यांचे काही करू शकत नाही. आज मला असे वाटते. वेगवेगळ्या बातम्या येत होत्या, असा खुलासा राज ठाकरेंनी केला.

दिल्लीतल्या बैठकीत काय ठरलं?

अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं योग्य वेळी सर्व मांडेन. माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, करावीच लागेल लपवून ठेवणारा नेता मी नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

मी अमित शहांना भेटल्यानंतर… 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. 2014 ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान होण्याआधी, 2019 ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान झाल्यानंतर… ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात, असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

दिल्लीत नेमकं काय झालं?; राज ठाकरे यांचा सर्वात मोठा खुलासा

‘…त्या काय मतदारांच्या डायपर बदलणार आहेत का?’; राज ठाकरे भडकले

मराठी पाट्या नसल्यास होणार मोठी कारवाई, अंमलबजावणीची तारीख आली समोर

गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात?, जाणून घ्या कारण

यंदाच्या चैत्र नवरात्रीसाठी ‘हे’ आहेत नऊ रंग; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट