ट्रकची भीषण धडक, गाडीचा चुराडा… नाना पटोलेंसोबत नेमकं काय काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nana Patole car accident | कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये पटोले थोडक्यात बचावले आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना ही धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत पटोले यांचा जीव थोडक्यात वाचला आहे.

भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. पटोले या गावी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना गाडीला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामुळे पटोले यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. ट्रकच्या धडकेत गाडीचा चुराडा झाला आहे.

अपघात नेमका कुठं झाला?

हा अपघात इतका भीषण होता की, नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवानं नाना पटोले(Nana Patole car accident ) आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्व जण सुरक्षित आहेत.

ट्रकचा वेग जास्त असल्याने गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना ही घटना घडली. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार करून नाना पटोले परतत असताना ही घटना घडली.

नाना पटोले थोडक्यात बचावले

मंगळवारी पटोले (Nana Patole car accident ) यांनी भंडारा तालुक्यातील गणेशपूर येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधला.त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. मात्र, येथून परत येत असताना ही घटना घडली.

सदर अपघाताबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ट्रकचं नित्रंयण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज लावला जात आहे. भरधाव ट्रक ताफ्यात घुसून हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.

News Title- Nana Patole car accident

महत्त्वाच्या बातम्या-

…अवघ्या 2 धावांनी सनरायझर्स हैदराबादचा विजय

पंजाबच्या पराभवामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला; हे आहेत टॉप 4 संघ

राजस्थान रॉयल्सचा विजयरथ गुजरातवाले रोखणार का? आज होणार RR vs GT सामना

या राशीच्या व्यक्तींनी बाहेरगावी जाताना काळजी घ्यावी

मोठी बातमी! फक्त मोदींसाठी राज ठाकरेंचा भाजपला बिनशर्त पाठिंबा