Chanakya Niti | आचार्य चाणक्य हे देशातील विद्वान आचार्य आहेत. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचं अनेक लोक पालन करतात. आचार्य चाणक्य हे नेहमी मानवाला आपल्या
जीवनात यश मिळवायचं असेल तर चाणक्य यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलंय. मार्गदर्शन केलं आहे. चाणक्य नीतीमुळे मानवाच्या जीवनाला योग्य मार्ग सापडतो. चाणक्य अनेक गोष्टींवर भाष्य करतात. त्यांनी आता पैसे न टिकण्याचं कारण सांगितलं आहे.
अशा लोकांकडे पैसे टीकणं अवघड
मानवाच्या जीवनामध्ये पैसा फार महत्त्वपूर्ण घटक आहे. अनेकांना देव पैसे देऊन पाहतो. मात्र हे पैसे कशाप्रकारे वापरायचे याचं ज्ञान नसेल तर अशा व्यक्तींकडे पैसे टीकणं अवघड होतं. जो व्यक्ती कारण नसताना कोणत्याही ठिकाणी पैसे खर्च करत असेल तर त्या व्यक्तीकडे पैसे शिल्लक राहणार नाही, असं चाणक्य नीती सांगते.
चाणक्यनीतीने पैसे टिकत नसल्याचं एक कारण सांगितलं आहे. ज्या व्यक्तीला कष्ट न करता पैसा आला असेल तर त्या व्यक्तीकडे पैसे राहणार नाहीत. ती व्यक्ती लगेचच पैसे उडवेल. तसेच ज्या व्यक्तीने मेहनत करून पैसे कमावले आहेत. अशा लोकांकडे पैसे टिकतात. कारण अशा लोकांनी मेहनत केली असते त्यामुळे असे व्यक्ती पैसे खर्च करताना विचार करत असतात.
पैसे असणाऱ्यांकडे घमंडीपणा असेल तर…
पैसे असणाऱ्या व्यक्तींकडे जर घमंडीपणा असेल तर अशा लोकांकडे पैसे राहणार नाही. कारण घमंडीपणा करणाऱ्या व्यक्तींकडे पैसे राहत नाहीत. लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज असते. यामुळे व्यक्तीने कधीही घमंडीपणा करू नये अन्यथा त्या व्यक्तीस वाईट परिणाम भोगावे लागतील.
पैसे असणाऱ्या व्यक्तींच्या डोळ्यावर धुंदी असते. त्यांना चांगलं वाईट यातला फरकच कळत नाही. पैशामुळे ते एखादं खराब काम करतात. याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
पैसे आल्यानंतर तो पैसा मनुष्याकडे राहतोच असं नाही. त्यामुळे पैसा आला तरीही कुठेही खर्चू नये. कारण उद्या माणसाकडे पैसे नसल्याने माणूस कंगाल होतो. त्याला इकडं तिकडं पैशांसाठी हात पसरावे लागतात. म्हणून चाणक्यनीतीने पैसे आल्यानंतर घमंडीपणा करणं टाळावा अशी शिकवण दिली आहे.
News Title – Chanakya Niti Say arrogant People Never Save Money
महत्त्वाच्या बातम्या
“माझ्या घरात अडीच महिने लाईट नव्हती”, तेजस्विनी पंडितने सांगितला धक्कादायक किस्सा
मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, मी मनसेचाच अध्यक्ष राहणार- राज ठाकरे
दिल्लीत नेमकं काय झालं?; राज ठाकरे यांचा सर्वात मोठा खुलासा
‘…त्या काय मतदारांच्या डायपर बदलणार आहेत का?’; राज ठाकरे भडकले
मराठी पाट्या नसल्यास होणार मोठी कारवाई, अंमलबजावणीची तारीख आली समोर