आता घर घेण्याचं स्वप्न होईल साकार; होम लोनवर ‘या’ बँका देतायेत सर्वांत कमी व्याजदर

Home Loan Interest Rates | प्रत्येकालाच आयुष्यात आपलं स्वतःच एक घर असावं, अशी इच्छा असते. यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली जाते. बरेच जण घरासाठी मोठं लोन काढतात.पण, याचा व्याजदर इतका मोठा असतो, की ते फेडता-फेडता आयुष्य निघून जातं. यामुळे बऱ्याच गोष्टी मग अॅडजस्ट कराव्या लागतात.

आता तुम्हाला घर बनवण्यासाठी बरीच वर्ष कर्ज फेडावं लागणार नाही, कारण या लेखात तुम्हाला काही अशा बँकांची माहिती सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला खूप कमी व्याजदर असणारे होम लोन मिळेल.यामुळे तुमचंही स्वतःच घर बनवण्याची इच्छा साकार होईल. या लेखात तुम्हाला सरकारी आणि प्रायव्हेट सेक्टरच्या अशा बँकांविषयी सांगणार आहोत. ज्या कमी इंटरेस्ट रेटवर होम लोन ऑफर करतात.

होम लोनसाठी ‘या’ बँका ठरतील बेस्ट ऑप्शन

नुकताच देशातील सर्वोच्च बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे.आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले नसल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील आढावा बैठकीपर्यंत रेपो रेट 6.50 इतका राहणार आहे. अर्थातच लोकसभा निवडणुका होईपर्यंतच्या तिमाहीदरम्यान व्याजदरांत कोणताही बदल होणार नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआय (Home Loan Interest Rates ) व्याजदरांमध्ये कपात करेल, अशी आशा होती.पण, आरबीआयने फक्त रेपोरेट कायम ठेवला आहे. सध्या तुम्हाला कमी व्याजदरावर होम लोन हवं असेल तर काही सरकारी आणि प्रायव्हेट बँका आहेत. ज्या खूप कमी इंटरेस्टवर तुम्हाला होम लोन देऊ शकतात.

‘या’ बँका देतील कमी व्याजदर

काही मिडिया रिपोर्टनुसार देशात अशा 15 बँका (Home Loan Interest Rates ) अशा आहेत. ज्या 20 वर्षांच्या कालावधीसाठी 75 लाख रुपये होम लोनवर 9.4 टक्केपेक्षा कमी व्याजदरावर ऑफर करत आहेत.  बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक आणि आयडीबीआय बँकमध्ये होम लोनवर व्याजदर हा 8.4 टक्केपासून सुरु होतो.

यासोबतच कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया होम लोनवर व्याजाचे दर हे 8.5 टक्केपासून सुरु होते. यात 20 वर्षांच्या कालावधीसाठी 75 लाख रुपयांच्या होम लोनवर तुम्हाला ईएमआय 64,650 रुपये भरावा लागेल. कोटक महिंद्रा बँकेमध्ये व्याजदर हा 8.7 टक्के, आयसीआयसीआय बँक 9 टक्के, तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेत होम लोनवर व्याजदर हे 9.15 टक्के आहे. तर, सर्वात मोठी प्रायव्हेट बँक एचडीएफसी बँकेत होम लोनवर व्याजदर हे 9.4 टक्केपासून सुरु होते.

News Title- Home Loan Interest Rates

महत्त्वाच्या बातम्या-

ट्रकची भीषण धडक, गाडीचा चुराडा… नाना पटोलेंसोबत नेमकं काय काय घडलं?

नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर

…अवघ्या 2 धावांनी सनरायझर्स हैदराबादचा विजय

पंजाबच्या पराभवामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला; हे आहेत टॉप 4 संघ

राजस्थान रॉयल्सचा विजयरथ गुजरातवाले रोखणार का? आज होणार RR vs GT सामना