महादेवानंतर हार्दिक पांड्या भगवान कृष्णाच्या भक्तीत तल्लीन!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वामध्ये मुंबई इंडियन्स संघ सुरूवातीला तिन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) सोशल मीडियावर तसेच मैदानामध्ये ट्रोलर्सचा सामना करावा लागला. सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या तिन्ही संघांविरोधात पांड्याच्या नेतृत्वात संघ खेळत असताना संघाला परभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पांड्या सोमनाथ मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गेला त्यानंतर त्याला दिल्ली कॅपिटल्सविरोधात यश मिळालं.

महादेवानंतर पांड्या श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा आधी महादेवाच्या मंदिरात गेला होता. आता तो भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला आहे. पांड्यासोबत बंधू कृणाल पांड्या देखील हरे राम…हरे राम…. भजन गाताना दिसत आहे. पांड्या ब्रदर्सने रंगीत कुर्ता घातलेला दिसत असून अवतीभोवती नातेवाईत, मित्रमंडळी दिसत आहेत.

हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स संघाची धुरा सांभाळायला दिल्यानं पांड्या खूश झाला. मात्र पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याच्या नेतृत्वामध्ये संघाचा पराभव झाल्यानं ट्रोलर्सनं पांड्याचं जगणं हराम करून टाकलं होतं. त्याला अनेक बाजूंनी ट्रोल केलं जात होतं. मुंबई इंडियन्सने चौथ्या सामन्यात यश मिळवलं. पांड्याची हाक महादेवाने ऐकल्याचं सोशल मीडियावर नेटकरी म्हणाले.

काय आहे नेमकं व्हिडीओत?

आता पांड्या ब्रदर्स भगवान श्रीकृष्णाचं भजन गात असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये कृणाल आणि हार्दिक दोघेही हरे कृष्णा हरे राम…असं बोलत आहेत. पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच आणि कृणाल पांड्याची पत्नी पंखुडी भजन गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे. याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही.


पांड्या ब्रदर्स हे वेगवेगळ्या संघातून खेळतात. हार्दिक मुंबई इंडियन्स संघाची धुरा सांभाळत आहे. तर कृणाल हा लखनऊ संघातून खेळत आहे. लखनऊ संघाच्या टीम मॅनेजमेंटनं कृणालचं उपकर्णधारपद काढलं आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.

News Title – Hardik Pandya Harey Ram Harey Ram Krishna Bhagwan Bhajan Video Viral

महत्त्वाच्या बातम्या

…अवघ्या 2 धावांनी सनरायझर्स हैदराबादचा विजय

पंजाबच्या पराभवामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला; हे आहेत टॉप 4 संघ

राजस्थान रॉयल्सचा विजयरथ गुजरातवाले रोखणार का? आज होणार RR vs GT सामना

या राशीच्या व्यक्तींनी बाहेरगावी जाताना काळजी घ्यावी

मोठी बातमी! फक्त मोदींसाठी राज ठाकरेंचा भाजपला बिनशर्त पाठिंबा