राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RR vs GT Highlights l IPL 2024 च्या 24 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 3 गडी राखून पराभव केला आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठण्यात यशस्वी झाला आहे. गुजरातला शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती. अष्टपैलू रशीद खानने अवेश खानच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून गुजरातला विजय मिळवून दिला आहे.

संजू सॅमसनची खेळी व्यर्थ :

गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना RR संघाने 20 षटकांत तीन गडी गमावून 196 धावा केल्या. डावाच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सला फारच संघर्ष करावा लागला आहे.

या सामन्यात संजू सॅमसनने 38 चेंडूत 68* आणि रियान परागने 48 चेंडूत 76 धावांची शानदार खेळी खेळली आहे. याशिवाय यशस्वी जैस्वालने 24 धावांचे योगदान दिले आहे. दरम्यान, गुजरातकडून गोलंदाजीत उमेश यादव, राशिद खान आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

RR vs GT Highlights l रशीद खानने केली उत्तम कामगिरी :

प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकात विजयाची नोंद करून “ऑल इज वेल दॅट एंड्स वेल” ही म्हण खरी करून दाखवली आहे. कारण राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी उच्च दर्जाची कामगिरी करत संघाला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला आहे.

गुजरातला शेवटच्या 10 षटकात 124 धावांची गरज होती, पण शुभमन गिल बाद झाला. मात्र यानंतर राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी दोन्ही बाजूंनी चौकार मारून सामन्यात जीवदान दिले आहे. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती आणि आवेश खान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळत होता. मात्र येथे स्ट्राइकवर असलेल्या राशिद खानने बाजी मारली. राशिदने 11 चेंडूत 24 धावा केल्या, तर तेवतियाने 11 चेंडूत 22 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

News Title :  RR vs GT Highlights

महत्त्वाच्या बातम्या –

या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता

‘आमची फसवणूक केली’; शेतकऱ्यानं विचारला जाब, चंद्रकांत पाटलांनी सभा गुंडाळली

‘…म्हणून बोलणी फिसकटली’; भाजप-शिवसेनेकडून मोठा खुलासा

पृथ्वी शॉने घेतला ‘इतक्या’ कोटींचा सी फेस फ्लॅट; किंमत ऐकून थक्क व्हाल

मोठी बातमी! शिवसेना आमदाराच्या कारचा भीषण अपघात