मोठी बातमी! शिवसेना आमदाराच्या कारचा भीषण अपघात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Accident | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा अपघात झाला होता. मात्र सुदैवाने ते अपघातातून सुखरूप बचावले. ही घटना ताजी असतानाच आणखी एका बड्या नेत्याच्या कारचा अपघात झाल्याची बातमी येऊन धडकली आहे.

आशिष जैस्वालांच्या कारचा अपघात

रामटेक विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याचं कळतंय. नागपूर पासून 21 किलोमीटर दूर अंतरावर असलेला कन्हान परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आमदार आशिष जयस्वाल यांच्या पीए समावेत त्यांच्या ताफ्यातील काहीजण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कन्हानमध्ये संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. कन्हान येथे बैठक होत असल्याने तयारीची संपूर्ण जबाबदारी आशिष जयस्वाल यांच्यावर देण्यात आली होती. हे पाहता गुरुवारी रॅलीत सहभागी होण्यासाठी सर्वजण रामटेकहून कन्हानच्या दिशेने निघाले. सभेच्या ठिकाणापूर्वी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्यवर्ती वळणाच्या पुढे मोठ्या सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या वाहनाला धडक बसली.

धडकताच कार रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कन्हान यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नाना पटोलेंच्या कारचा अपघात

दरम्यान, नाना पटोले मंगळवारी रात्री उशिरा भंडारा जिल्ह्यात त्यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याने ते थोडक्यात बचावले होते, त्यानंतर काँग्रेसने पटोले यांच्या जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला होता. पटोले हे निवडणूक प्रचार आटोपून परतत असताना कारधा गावाजवळ हा अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.

एका व्हिडीओ निवेदनात, नाना पटोले यांनी ट्रकने जाणूनबुजून त्यांच्या कारला धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

पांड्याचं टेन्शन वाढणार, ‘हे’ संघ ठरणार डोक्याला ताप

‘आमचा हक्काचा अण्णा…’; सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहोळांचा दणक्यात प्रचार

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ, ‘हा’ नेता कोणाचाच फोन घेईना

‘खोदा पहाड निकला चुहा’, भाजपला पाठिंबा दिल्याने राज ठाकरे ट्रोल

शरद पवारांचा बालेकिल्ला हिसकावून घेण्यासाठी भाजपचा मोठा डाव!