महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ, ‘हा’ नेता कोणाचाच फोन घेईना

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Varsha Gaikwad | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस पक्षातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या काही वेळापासून काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याचा फोन घेत नसल्यानं काँग्रेस पक्षाची धाकधूक वाढली. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले मात्र त्यांनी भेट दिली नाही.

वर्षा गायकवाड फोन उचलत नाहीत

आगामी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 9 दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच काँग्रेस पक्षाला संकटांचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता. पक्षाच्या अडचणीमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचं नाराजी नाट्य सुरू झालं आहे. ते कोणत्याही काँग्रेसमधील व्यक्तीचा फोन उचलत नसल्याने काँग्रेसमधील कलह पक्षाप्रती वेगळे संकेत तर देणार नाही ना? असा सवाल उपस्थित होतो.

मुंबई येथे काँग्रेसची बैठक होणार होती. मात्र वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या बैठकीला न आल्यानं कार्यकर्ते नाराज आहेत. यामुळे आजची बैठक रद्द करण्यात आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या कोअर कमिटीच्या सदस्य़ांचा देखील फोन घेत नाहीत. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य असल्याचं जाणवतंय.

नाराजी का?

महाविकास आघाडीच्या जागावाटपांवरून अनेक जागांवर वाद आहेत. मुंबईच्या एका जागेसाठी मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये बैठक घेण्यात येणार होती. मात्र वर्षा गायकवाड यांनी आपली उपस्थिती न दर्शवल्याने बैठक रद्द करण्यात आली. त्यांच्या बंगल्यावर देखील त्यांना भेटण्यासाठी नेते गेले होते मात्र त्या भेटल्या नाहीत.

वर्षा गायकवाड या त्यांच्या चेंबूरच्या बंगल्यावर आहेत. मात्र त्यांनी कोणाचाच फोन घेतला नाही. तर त्यांनी कोणाला भेटही दिली नाही. यामुळे काँग्रेसमध्ये भूकंप घडू शकतो का? वर्षा गायकवाड वेगळा मार्ग स्विकारू शकतात का? असे अनेक प्रश्न पक्षासमोर आले आहेत.

काँग्रेस पक्षामध्ये नेत्यांची अधिक अहवेलना होत असल्याचं काँग्रेस कार्यकर्ते म्हणत आहेत.  मुंबईमध्ये देखील काँग्रेस पक्षाला बरोबरीच्या जागा न दिल्यानं काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाने मुंबईमध्ये एकूण चार जागा घेतल्या आहेत म्हणून काँग्रेस नाराज आहे.

 News Title – Varsha Gaikwad Not Responce

महत्त्वाच्या बातम्या

अपघाताबद्दल स्वतः नाना पटोलेंनी केला सर्वात मोठा खुलासा!

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी आईने केलं भयंकर कृत्य; वाचून पायाखालची जमीन सरकेल

बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत

तुमच्याही चिमुकल्याला रात्री दूध पिण्याची सवय आहे तर वेळीच सावध व्हा!

तरुणांच्या आवडत्या Bajaj Plusar N250 बाईकच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत