अपघाताबद्दल स्वतः नाना पटोलेंनी केला सर्वात मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nana Patole | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला (09 एप्रिल) रोजी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, पटोले यांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं समोर आलं आहे. रात्री प्रचार आटपून सकाळी गावी जात असताना ही घटना घडली. पटोलेंच्या अपघाताची बातमी समजताच सगळीकडे एकच खळबळ उडाली. ही घटना भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ घडली आहे. दरम्यान अपघाताबदल बोलत असताना नाना पटोले यांनी काही अरोप करत मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

अपघातानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. नाना पटोले म्हणाले की, रात्री प्रचार आटपून सकाळी गावी येत असताना आमच्या वाहनाला अपघात झाला. दरम्यान, एका ट्रकने मुद्दाम धडक दिली असा गंभीर आरोप अपघातानंतर नाना पटोले यांनी केला आहे.

आम्ही तर यातून बचावलो, सुखरूप राहिलो पण गाडीचं बरंच नुकसान झालं. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप राहिलो, कोणी काळजी करू नये असे पटोले यांनी स्पष्ट केले. मात्र हा अपघात म्हणजे घातपात होता की काय याचाही पोलिस तपास करतील असेही पटोले यांनी नमूद केले आहे.

X वर पोस्ट व्हायरल-

या अपघातानंतर (Nana Patole) आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? असा सवालच लोंढे यांनी नाना पटोलेंच्या अपघातानंतर विचारला आहे.

पोलिसांकडून तपास-

अपघाताबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ट्रकचं नित्रंयण सुटल्यानं हा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे. भरधाव ट्रक ताफ्यात घुसून हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.

News Title : Nana patole reveals about car accident

महत्त्वाच्या बातम्या-

बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत

तुमच्याही चिमुकल्याला रात्री दूध पिण्याची सवय आहे तर वेळीच सावध व्हा!

तरुणांच्या आवडत्या Bajaj Plusar N250 बाईकच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत

“मी तोंड उघडलं तर…”, अजित पवारांचा कुटुंबातील व्यक्तींना इशारा

एप्रिलमध्ये आहे चैत्र विनायक चतुर्थी; जाणून घ्या पूजेची शुभ वेळ आणि तारीख