“शाल घेऊन फिरल्यावर बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | मनसे नेते राज ठाकरे यांनी काल (9 एप्रिल) शिवतीर्थावर पाडवा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी भाजपलाबिनशर्त पाठिंबा दर्शवला. यानंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटाने त्यांना डिवचलं आहे.

‘मला शिवसैनिकाने विचारलं, तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? त्याच्यात नाही का गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. तशी एक केस आपल्याकडे आहे, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झालं असं वाटतं. हल्ली शाल घेऊन फिरतात कधी, मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात.’, असं या व्हिडीओत उद्धव ठाकरे म्हणतात दिसत आहेत.

उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर प्रहार

‘चित्रपटातला मुन्नाभाई किमान लोकांची मदत तरी करत होता. लोकांचं भलं करत होता. एक लक्षात घ्या, शेवटी त्या मुन्नाभाईला कळतं की, आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. तर ही केमिकल लोचाची केस आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. असं मुन्नाभाई फिरत आहेत, तर फिरू द्या’, असा टोला उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओत अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना लगावला आहे.

शिवसेनेनं एक्सवर ([पूर्वीचे ट्वीटर) अजून एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटल की, आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही! आमच्या मातीचा, महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्हाला प्राणपणाने जपायचाय! हा स्वाभिमान जपण्यासाठी, सदैव धगधगत राहणार ठाकरेंची मशाल! यासोबत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray ) भाषणाचा व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे.

“महाराष्ट्र हा लेच्या-पेच्यांचा नाही, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मर्दांचा प्रदेश आहे. आपल्याया आपल्या महाराष्ट्राची ओळख तिच ठेवायची आहे, कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा. आता जे चाललंय ते, गुंडांच्या, लाचारांच्या, नामर्दांच्या देशा, अशी महाराष्ट्राची ओळख नाही.”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर शिवसेनेनं पोस्ट केला आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, कालच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी केली. ‘मोदींकडून देशाला अपेक्षा आहेत.आज या जगात सर्वात तरुण देश असेल तर तो आपला भारत देश आहे. सर्वाधिक तरुण सध्या भारतात आहेत. या तरुणांना-तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. आणखी 10 वर्षांनी हा देश वयस्कर व्हायला लागणार. माझी मोदींकडून अपेक्षा आहे की भारतातल्या तरुणांकडे लक्ष द्या.’, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

News Title- Uddhav Thackeray on Raj Thackeray

महत्त्वाच्या बातम्या –

बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत

तुमच्याही चिमुकल्याला रात्री दूध पिण्याची सवय आहे तर वेळीच सावध व्हा!

तरुणांच्या आवडत्या Bajaj Plusar N250 बाईकच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत

“मी तोंड उघडलं तर…”, अजित पवारांचा कुटुंबातील व्यक्तींना इशारा

एप्रिलमध्ये आहे चैत्र विनायक चतुर्थी; जाणून घ्या पूजेची शुभ वेळ आणि तारीख