पुण्यात प्रचाराला रंगत, मुरलीधर मोहोळ यांना ‘होम मिनिस्टर’ची संगत!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेसाठी सर्वप्रथम उमेदवारी जाहीर झालेले भाजपचे (BJP) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी प्रचारात चांगलाच जोर पकडला आहे. पक्षाच्या दुसऱ्याच यादीत पुणे लोकसभा मतदार संघातून पक्षाने मुरलीधर मोहोळ याचं नाव जाहीर केलं. नावाची घोषणा झाल्यानंतर मोहोळ यांनी ग्रामदेवतांच्या दर्शनाने आपल्या प्रचाराला सुरूवात केली. सोशल मीडियावर तरुणांसाठी रिल्स तर ज्येष्ठांसाठी घरोघरी जाऊन भेटीगाठी देण्यावर मोहोळ यांनी भर दिला आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मोहोळ विविध मार्गाने प्रचार करत आहेत. या प्रचारात मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ देखील आता सक्रिय होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुरलीधर मोहोळ यांना ‘होम मिनिस्टर’ची संगत

मोनिका मोहोळ यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्या आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या साथीने भेटीगाठी सुरू केल्या. त्यामुळे सुरूवातीपासूनच मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या एका बाजूची धुरा होम मिनिस्टर सांभाळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मोनिका मोहोळांनी घेतल्या आजी-माजी नगरसेवकांच्या भेटीगाठी

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मोनिका मोहोळ यांनी शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघातील मान्यवर, आजी-माजी नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली. गेल्या पंधरा दिवसात त्यांनी मतदारसंघात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीगाठी दरम्यान शक्य झाले तिथे त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्याही घऱी जाऊन त्यांना भेटत आहेत.

निवडणूक प्रचार याबद्दल कार्यकर्त्यांची मत त्यांनी जाणून घेतली. सध्याचा वाढता उन्हाळा बघून त्या कार्यकर्त्यांना उन्हापासून बचाव करत प्रचार आणि पक्षाचे काम करा. आपल्याला 13 मेपर्यंत ही लढाई लढायची असल्याने आपण आजारपणामुळे प्रचारापासून दुर राहणार नाही याची काळजी घ्या, काही मदत लागली तर सांगा असं त्यांनी आवर्जून सांगितलं

मी महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केलं आहे. यात महापालिकेत अनेक सहकारी नगरसेवकांशी नव्याने ओळख झाली, मैत्रीही झाली. या पाच वर्षात मला समाजकारण आणि लोकांची कामं करण्याचं स्वातंत्र्य देत मुरलीधरआण्णांनी मला एकप्रकारे प्रशिक्षणच दिलं. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुढे कधीतरी सहभागी व्हावंच लागणार होतं, मग सुरूवातीपासूनच का आपण यात सहभागी होऊ नये. म्हणून या अनुभवाच्या जोरावरच मी सुरूवातीपासूनच प्रचारात सक्रिय होण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे स्वतंत्रपणे भेटीगाठी घेतल्या, असं त्यांनी सांगितलं.

मला जवळपास पाच निवडणुकींचा अनुभव असून तो अनुभव आज महत्त्वाचा ठरत आहे. भेटीगाठींमधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनसामान्यांच्या विश्वासाची साक्ष पदोपदी मिळत आहे. मी जवळपास सहाही विधानसभा मतदारसंघात जाऊन आले आहे. यापुढेही पक्षाच्या वतीने जसे नियोजन केले असेल तसे प्रचारात आपण सहभागी होणार असल्याचंही मोनिका यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शाल घेऊन फिरल्यावर बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं”

अपघाताबद्दल स्वतः नाना पटोलेंनी केला सर्वात मोठा खुलासा!

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी आईने केलं भयंकर कृत्य; वाचून पायाखालची जमीन सरकेल

बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत

तुमच्याही चिमुकल्याला रात्री दूध पिण्याची सवय आहे तर वेळीच सावध व्हा!