बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BOI Recruitment 2024 | बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 143 जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्जही मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी काही पात्रता ठेवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार bankofindia.co.in च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

या भरतीसाठीचे अर्ज 27 मार्च 2024 पासून सुरू झाले आहेत. याची अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही आज 10 एप्रिल 2024 पर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी फक्त आजचा दिवस शिल्लक आहे. बँकेत नोकरी करण्याची ही सुवर्ण संधी गमावू नका, आजच जवळच्या नेटकॅफेत किंवा घरीच तुमच्या संगणकावर याचा अर्ज भरून टाका.

अर्ज करण्यासाठी पात्रता काय?

अर्जदारांसाठी विविध प्रवाहांमधील रिक्त पदांसाठी अर्जाची पात्रता भिन्न असू शकते. त्यामुळे bankofindia.co.in या संकेतस्थळावर दिलेली संपूर्ण भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.

अर्ज शुल्क किती असणार?

उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या (BOI Recruitment 2024) या रिक्त जागेसाठी, सामान्य आणि इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी 859 रुपये शुल्क आहे. तर एससी, एसटी आणि अपंगांसाठी 175 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अर्ज फी मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड किंवा रुपे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे जमा केली जाऊ शकते.

निवड प्रक्रिया कशी होणार?

बँक ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी (BOI Recruitment 2024) पात्र उमेदवारांची ऑनलाइन, लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. ही निवड प्रक्रिया अर्जांची संख्या आणि पात्र उमेदवारांच्या संख्येवर अवलंबून असणार आहे.

ऑनलाइन लेखी परीक्षेत इंग्रजी भाषा, संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक प्रवीणता, सामान्य ज्ञान आणि बँकिंगशी संबंधित प्रश्न विचारले जातील. इंग्रजी भाषा वगळता इतर सर्व विषयांचे प्रश्न हिंदी आणि इंग्रजी भाषेत असतील. इंग्रजी परीक्षा ही पात्रता स्वरूपाची असेल, अर्थातच गुणवत्ता यादीत इंग्रजीचे गुण समाविष्ट केले जाणार नाहीत.

‘या’ पदांची होणार भरती

मुख्य व्यवस्थापक-अर्थशास्त्रज्ञ
मुख्य व्यवस्थापक – IT – डेटाबेस प्रशासक
मुख्य व्यवस्थापक – IT – क्लाउड ऑपरेशन्स
मुख्य व्यवस्थापक – आयटी – नेटवर्क
मुख्य व्यवस्थापक – आयटी – सिस्टम्स
मुख्य व्यवस्थापक – आयटी – इन्फ्रा
मुख्य व्यवस्थापक – आयटी – माहिती/सुरक्षा
मुख्य व्यवस्थापक – विपणन (मुख्य वित्त व्यवस्थापक)
कायदा अधिकारी
डेटा सायंटिस्ट
ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर
डेटाबेस प्रशासक
डेटा गुणवत्ता डेव्हलपर
डेटा गव्हर्नन्स स्पेशलिस्ट
प्लॅटफॉर्म इंजीनियरिंग स्पेशलिस्ट
लिनक्स प्रशासक
ओरॅकल Xadata प्रशासक
वरिष्ठ व्यवस्थापक – आयटी
वरिष्ठ व्यवस्थापक – IT- डेटा विश्लेषक
वरिष्ठ व्यवस्थापक – आयटी – डेटाबेस
वरिष्ठ व्यवस्थापक – IT – क्लाउड ऑपरेशन्स
वरिष्ठ व्यवस्थापक – IT – नेटवर्क सुरक्षा/ऑपरेशन्स
वरिष्ठ व्यवस्थापक – आयटी – सिस्टम्स (विंडोज / सोलारिस / आरएचईएल)
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी-इन्फ्रा
वरिष्ठ MGR – टूल मॅनेजमेंटसाठी IT एंडपॉईंट सिक्युरिटी मॅनेजर
वरिष्ठ व्यवस्थापक – आयटी – सुरक्षा विश्लेषक
वरिष्ठ Mgr – IT – GRC (जोखीम आणि नियंत्रण)
वरिष्ठ व्यवस्थापक – आयटी (फिनटेक)
वरिष्ठ व्यवस्थापक – IT-संख्याशास्त्रज्ञ
कायदा अधिकारी

News Title : BOI Recruitment 2024 Application Deadline
महत्त्वाच्या बातम्या-

ट्रकची भीषण धडक, गाडीचा चुराडा… नाना पटोलेंसोबत नेमकं काय काय घडलं?

नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर

…अवघ्या 2 धावांनी सनरायझर्स हैदराबादचा विजय

पंजाबच्या पराभवामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला; हे आहेत टॉप 4 संघ

राजस्थान रॉयल्सचा विजयरथ गुजरातवाले रोखणार का? आज होणार RR vs GT सामना