शरद पवारांचा बालेकिल्ला हिसकावून घेण्यासाठी भाजपचा मोठा डाव!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) निवडणुकीकडं राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलंय. नणंद आणि भाऊजय या एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाचा दौरा करत आहेत. दोन्ही गटातून प्रचार सुरू आहे. अशातच आता बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेची.

बारामतीमध्ये नरेंद्र मोदींंची सभा?

बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील खडकवासला मतदारसंघात नरेंद्र मोदींची सभा होणार असल्याची शक्यता आहे. खडकवासला येथे सुप्रिया सुळे यांचा मोठा मतदार वर्ग आहे. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खडकवासला येथे सभा घेणार असल्याची चर्चा आहे. ही सभा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यामध्ये होणार असल्याची शक्यता आहे.

मोदींची होणारी सभा ही बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी असणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहेत. सुप्रिया सुळे दोनदा खासदार झाल्या आहेत. तसेच त्या दोनदा संसदरत्न आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पाठिंब्याने पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलंय.

पवार विरूद्ध पवार लढत होणार

पवार विरूद्ध पवार अशी ही लढत पाहायला मिळणार आहे. दोघांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर पवार विरूद्ध पवार अशी लढत बारामती मतदारसंघात होणार आहे.

मोदींची सभा घेण्याच्या हालचाली सध्या बारामतीमध्ये आहे. भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री बारामतीच्या मतदारसंघात येत आहेत. मागे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी बारामतीचा दौरा केला होता. आता नरेंद्र मोदी यांना बारामतीच्या खडकवासला मतदारसंघात बोलवून शरद पवार यांना टार्गेट करण्यासाठी मोदींची सभा घेण्यात येणार आहे.

काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांनी भाजपविरोधात वक्तव्य केलं होतं. बारामती मिळवण्यासाठी भाजपने अनेक उमेदवार दिले होते. त्यांना माहिती होतं की शरद पवार यांची याठिकाणी ताकद अधिक आहे. यामुळे अनेक उमेदवार लढण्यासाठी दिले होते. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघ पवार यांच्या बाजूनं राहिला. त्यांना माहिती आहे शरद पवारांऐवढा मोठा नेता महाराष्ट्रात नाही. म्हणून त्यांनी पवार कुटुंब फोडलं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्ला चढवला होता.

News Title – Baramati Lok Sabha In PM Modi Will Meet With Baramatikars

महत्त्वाच्या बातम्या

“मी तोंड उघडलं तर…”, अजित पवारांचा कुटुंबातील व्यक्तींना इशारा

एप्रिलमध्ये आहे चैत्र विनायक चतुर्थी; जाणून घ्या पूजेची शुभ वेळ आणि तारीख

पुढील चार दिवस ‘असं’ राहील वातावरण; हवामान विभागाचा अंदाज

OnePlus चा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत

पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल; तरुणांना केलं महत्त्वाचं वाहन