“मी तोंड उघडलं तर…”, अजित पवारांचा कुटुंबातील व्यक्तींना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok Sabha | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या (Baramati Lok Sabha) दौऱ्यावर होते. दौऱा करत असताना त्यांनी नाव न घेता श्रीनिवास पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. अनेक दिवसांपासून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याविरोधात पवार कुटुंब प्रचार करताना दिसत आहे. आता अजित पवार यांनी पवार कुटुंबियांना सुनावलं आहे. मी जर तोंड उIडलं तर फिरता येणार नाही, तोंड दाखवता येणार नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. (Baramati Lok Sabha)

बारामतीच्या लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाकडे राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. नणंद आणि भाऊजय भिडणार आहेत. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाचा मतदार राजा नेमकं कोणाला मत देणार? हे पाहणं गरजेचं असेल. बारामतीच्या दौऱ्यावर अजित पवार होते. यावेळी बोलत असताना त्यांनी आपला भाऊ श्रीनिवास पवार यांचा खरपूस समाचार घेतला.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी बोलत असताना कोणाचंही नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्या बाजूनं प्रचार करणाऱ्या पवारांवर हल्ला केलाय. अजित पवार म्हणाले की, “माझ्या निवडणुकीमध्ये भावंडं कधीही फिरली नाहीत. आता गरागरा फिरत आहेत. पावसाळ्यात छत्र्या उगतात तशी उगवली आहेत. मी फार तोलून मापून बोलतोय. एकदा का जर मी तोंड उघडलं तर कित्येकांना तोंड दाखवता येणार नाही. तोंड लपवून फिरावं लागेल. पाणीही देणार नाही. मी गप्प बसलो फार वळवळ करता का?”, असा सवाल करत अजित पवार यांनी श्रीनिवास पवार यांचं नाव न घेता त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

काही दिवसांआधी बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवसेना माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत इच्छा व्यक्त केली. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजोता करत विजय शिवतारे यांना माघार घेण्यासाठी सांगितलं असल्याचं अजित पवार म्हणाले होते. त्यावेळी विजय शिवतारे यांना अनेक ठिकाणाहून फोन येत होते. त्याविषय़ी अजित पवार यांनी सांगितलं आहे.

शिवतारेंना आला तो फोन

विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मनधरणी केल्यानं त्यांनी माघार घेतली होती. मात्र त्यावेळी त्यांना इतरही अनेक फोन येत होते. त्यावर अजित पवार यांनी शिवतारे यांना आलेल्या फोनचा एक किस्सा सांगितला.

शिवतारे यांना आलेल्या फोनमधून अनेकांनी माघार न घेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी ते नंबर कोणाचे आहेत हे कळेल. हे नंबर विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवले. सध्या कोणत्या पातळीवरचं राजकारण सुरू आहे हे दिसत आहे, असं अजित पवार म्हणाले.

News Title – Baramati Lok Sabha Ajit Pawar Taunt To Shrinivas Pawar

महत्त्वाच्या बातम्या

आता घर घेण्याचं स्वप्न होईल साकार; होम लोनवर ‘या’ बँका देतायेत सर्वांत कमी व्याजदर

अशा स्वभावाच्या व्यक्तींकडे पैसे टीकत नाहीत, आचार्य चाणक्यांनी सांगितलं कारण

ट्रकची भीषण धडक, गाडीचा चुराडा… नाना पटोलेंसोबत नेमकं काय काय घडलं?

नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर

…अवघ्या 2 धावांनी सनरायझर्स हैदराबादचा विजय