‘खोदा पहाड निकला चुहा’, भाजपला पाठिंबा दिल्याने राज ठाकरे ट्रोल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray Memes | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर झाला. त्यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीमागचं कारण सांगितलं. शिवसेना पक्षाचे राज ठाकरे प्रमुख होणार असल्याची चर्चा होती. त्यावर देखील राज ठाकरे यांनी असल्या विचारांना मी शिवतही नाही असं वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. मी मोदींना बीनशर्त पाठिंबा देणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यावरून आता सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्यावर मीम्सचा (Raj Thackeray Memes) पाऊस पडत आहे.

राज ठाकरेंचे सोशल मीडियावर मीम्स

राज ठाकरे एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत. मात्र आता नेटकऱ्यांनीच राज ठाकरे यांनी मोदींना दिलेल्या पाठिंब्यामुळे मीम्समधून डिवचलं आहे. जिकडे तिकडे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. एका मीम्समध्ये खोदा पहाड निकला चुहा अशा आशयाचं कॅप्शन देण्यात आलंय. त्यामध्ये वाघाची झालर असलेला उंदीर दिसत आहे. त्याच्या हातात कमळ आहे. (Raj Thackeray Memes)

खोदा पहाड, निकला चूहा

दुसऱ्या मीम्समध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करण्यात आली आहे. मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे आता दुसऱ्या मीम्समध्ये एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी हात जोडलेला फोटो दिसतोय तर त्याविरोधात राज ठाकरे यांचा फोटो दिसत आहे. त्यावेळी मीम्स मेकरनं कॅप्शन लिहिलं आहे की, ‘आता कळालं की बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना का निवडलं.’ (Raj Thackeray Memes)

एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, आता कळलं बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंऐवजी उद्धव ठाकरेंना का निवडलं.

सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने पोस्ट केली आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांचा फोटो दिसत असून त्यामध्ये अशी भूमिका घ्या की कार्यकर्ते मानसिक रूग्ण झाले पाहिजे, असं एका पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं.

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसैनिक संभ्रमात असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

एका नेटकऱ्याने संजय राऊत आणि राज ठाकरे यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांच्या पेक्षा संजय राऊत सरस निघाले. ना ईडीला घाबरले ना कोणाला घाबरले ना भाजपला शरण गेले असं कॅप्शन त्या पोस्टला एका नेटकऱ्यानं केलं होतं.

एकाने म्हटलं आहे की, राज ठाकरेंपेक्षा संजय राऊत बरे, तुरुंगात गेले पण भाजपला शरण गेलं नाहीत.

आपण अनेक वर्षांपासून किती उमेदवार जिंकून दिले? असा प्रश्न नेटकऱ्यानं केला असून त्यामध्ये राज ठाकरे यांचे भाषण करतानाचे फोटो एकत्र करण्यात आलेत.

सोशल मीडियावर असे अनेक मीम्स व्हायरल होत असून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत.

News Title – Raj Thackeray Memes

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत

तुमच्याही चिमुकल्याला रात्री दूध पिण्याची सवय आहे तर वेळीच सावध व्हा!

तरुणांच्या आवडत्या Bajaj Plusar N250 बाईकच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत

“मी तोंड उघडलं तर…”, अजित पवारांचा कुटुंबातील व्यक्तींना इशारा

एप्रिलमध्ये आहे चैत्र विनायक चतुर्थी; जाणून घ्या पूजेची शुभ वेळ आणि तारीख