‘आमचा हक्काचा अण्णा…’; सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहोळांचा दणक्यात प्रचार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Murlidhar Mohol | देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. येत्या काही दिवसात मतदानाला सुरुवात होईल. त्यामुळे उमेदवारांनी मोठ्या दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोहोळ यांनी घरोघरी जाऊन सगळ्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा चंग बांधला आहे. यासोबतच मोहोळ सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व सामान्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

रिल्सच्या माध्यमातून प्रचार-

लोकसभा निवडणूक जवळ येत आहेत. त्यामुळे उमेदवार तयारीला लागले आहेत. यामध्ये उमेदवार सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचं पहायला मिळत आहे. यात पुण्याचे लोकसभा उमेदवार मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा देखील समावेश आहे. मुरलीधर मोहोळ यांची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याचाच आधार घेत त्यांनी थेट रिल्सच्या माध्यमातून प्रचार सुरु केला आहे.

सोशल मीडियावर वेळोवेळी अपडेट्स देत आणि रिल्सच्या माध्यमातून तरुणांपर्यंत मोहोळ पोहोचत असल्याचं दिसत आहे. एवढंच नाही तर मोहोळ भेटीगाठींवर देखील भर देत प्रचार करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल-

 

View this post on Instagram

 

A post shared by Murlidhar Mohol (@murlidharkmohol)

आपल्या अधिकृत अकाउंटवर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी प्रचार केलेेले व्हिडीओ आणि पोस्ट शेअर केले आहेत. मोहोळ यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. युवकांनी कमेंट्स करत लिहिलंय की, ‘भावी खासदार आमचे अन्ना…’ तर ‘सर्व सामान्य व्यक्तिमत्व सर्व सामान्यांचा नेता मुरली अण्णा मोहोळ’ असं म्हटलं आहे.

मतदान रुपी आशीर्वाद द्यावे- मुरलीधर मोहोळ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून मी जनसेवेचे व्रत घेतले आहे. महायुतीने पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मला दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात देश विकसित भारताच्या दिशेने प्रगती करत आहे. विकसित पुण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात शहरात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले आहे. पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आपण मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावा, असं मोहोळ यांनी म्हटलं आहे.

News Title : murlidhar mohol started election camping in pune

महत्त्वाच्या बातम्या-

‘खोदा पहाड निकला चुहा’, भाजपला पाठिंबा दिल्याने राज ठाकरे ट्रोल

शरद पवारांचा बालेकिल्ला हिसकावून घेण्यासाठी भाजपचा मोठा डाव!

पुण्यात प्रचाराला रंगत, मुरलीधर मोहोळ यांना ‘होम मिनिस्टर’ची संगत!

“शाल घेऊन फिरल्यावर बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं”

अपघाताबद्दल स्वतः नाना पटोलेंनी केला सर्वात मोठा खुलासा!